Housefull 5 teaser out : हाऊसफूल 5 चे टिझर रिलिज; तब्बल 76 सेकंदात दिसले 18 कलाकार, क्रूझवर खुनी खेळ
Housefull 5 teaser out : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल'ने फूल्ल धडाका लावला असून आता या मालिकेचा पाचवा भाग रिलिज होण्याच्या मार्गावर आहे. अर्थात हाऊसफूल 5 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आज 30 एप्रिल 2025 रोजी या सिनेमाचे टीझर रिलिज झाले आहे. या टिझरचा मनमुराद आनंद चित्रपट रसिक घेत आहेत.
दोन चार नव्हे तर तब्बल 18 कलाकार या सिनेमात आपली कला सादर करत आहेत. या चित्रपटात यावेळी क्रुझवर धमाल अन् खुनी खेळ समाविष्ट आहे.

चित्रपटाकडून निर्मात्यांना अपेक्षा
देशात छावाच्या यशानंतर सिकंदर फ्लाॅप ठरला. त्यानंतर आता रसिकांना आशा लागल्या त्या अक्षयकुमारच्या हाऊसफूल 5 कडून हा धमाल चित्रपट असेल असे रसिकांना वाटते तर दुसरीकडे या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही खूप अपेक्षा आहेत. लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे.
टीझरमध्ये एकत्र दिसले 18 कलाकार
तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक बॉलिवूड स्टार एकत्र दिसत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. टीझरमध्ये एकत्र दिसले 18 कलाकार. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे एकूण 18 कलाकार आहेत. या सर्व कलाकारांची झलक टीझरमध्ये पाहता येते. काही सेकंदांच्या टीझरमध्ये धमालच धमाल आहे.
76 सेकंदाच्या टीझरने गोंधळ उडवला
आज प्रदर्शित झालेल्या हाऊसफूलच्या टीझर हा 76 सेकंदाचा आहे. 76 सेकंदाच्या टीझरने लोकांची मने जिंकली आहेत. लोकांना हा टीझर खूप आवडला आहे. 76 सेकंदांच्या टीझरमध्ये 18 पात्रांची झलक दिसते. टीझरच्या सुरुवातीला एक मोठे जहाज दिसते, जे समुद्रात आहे आणि लोक त्यावर मजा करताना दिसत आहेत. सर्व कलाकार आपापल्या भूमिकेत आहेत आणि या सगळ्यामध्ये, एक खुनी आहे जो चेहरा लपवत आहे.
'हाऊसफुल 5' ची रिलीज डेट जाणून घ्या - टीझर पाहिल्यानंतर लोक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
'हाऊसफुल' हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि दोन वर्षांनी 'हाऊसफुल 2' प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक साजिद खान होते. यानंतर 2016 मध्ये 'हाऊसफुल 3' प्रदर्शित झाला. नंतर 2019 मध्ये 'हाऊसफुल 4' प्रदर्शित झाला. -'हाऊसफुल' चित्रपटाच्या सर्व मालिका साजिद नाडियाडवाला यांनी तयार केल्या आहेत. तथापि, या फ्रँचायझीच्या प्रत्येक चित्रपटात एक नवीन कथा पाहायला मिळाली आहे.












Click it and Unblock the Notifications