बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या' सुसाट, तब्बल एवढ्या कोटींची कमाई
Mumbai: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली असून याचा पुरावा म्हणजे चित्रपटाचे दमदार कलेक्शन.
या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातही बरीच कमाई केली आणि खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक व्यवसाय केला. 'मुंज्या'ने रिलीजच्या 14व्या दिवशी किती कमाई केली आहे हे जाणून घेऊया.

रिलीजच्या 14 व्या दिवशी 'मुंज्याची' कमाई किती?
मोठ्या स्टारकास्टशिवाय कमी बजेटच्या 'मुंज्या' चित्रपटाने तिकीट काउंटरवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून यासोबतच या चित्रपटाच्या कलेक्शनमध्येही दररोज कोटींची वाढ होत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून यासोबतच चित्रपटाने आपल्या बजेटच्या दुप्पट व्यवसाय केला आहे.
'मुंज्या'च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ४ कोटींचे खाते उघडले होते. यानंतर चित्रपटाचे पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचे कलेक्शन झाले. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ३.५ कोटी, दुसऱ्या शनिवारी ६.५ कोटी कमावले.
तर दुसऱ्या रविवारी ८.५ कोटी, दुसऱ्या सोमवारी ५.२५ कोटी, दुसऱ्या मंगळवारी ३.४ कोटी आणि दुसऱ्या बुधवारी ३ कोटींचा व्यवसाय केला. आता या चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे रिलीजच्या १४ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी आले आहेत.
रिपोर्टनुसार, 'मुंज्या' ने रिलीजच्या 14 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी 2.17 कोटी रुपये कमावले आहेत. यासह 14 दिवसांत 'मुंज्या'चा एकूण व्यवसाय 67.62 कोटी रुपयांचा झाला आहे.
100 कोटींपासून काही पावलं दूर 'मुंज्या'
'मुंज्या'चा कमाईचा वेग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चित्रपट दररोज कोटींचा गल्ला जमवत आहे. रिलीजला दोन आठवडे पूर्ण झाल्यानंतर 'मुंज्या'ने 67 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
यासोबतच हा चित्रपट आता १०० कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. चित्रपटाचा सुपर स्पीड लक्षात घेता लवकरच हा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.
'मुंज्या'चे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. हा चित्रपट दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या सुपरनॅचरल युनिव्हर्समधील स्त्री, रूही आणि भेडिया नंतरचा चौथा चित्रपट आहे.'मुंज्या'मध्ये शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
याच युनिव्हर्समधील स्री या चित्रपटाचा दुसरा भाग १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. स्री २ मध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव हे प्रमुख भूमिकेत आहेत.












Click it and Unblock the Notifications