बाॅलिवूडची होळी: सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, कृती सेनन रंगले होळीच्या रंगात, पहा काय- काय केले?
आज १४ मार्चला देशभरात होळी व रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सामान्य लोकांसोबतच बाँलिवूड व दाक्षिणात्य कलाकारांनीही होळी धुमधडाक्यात साजरी केली. बी-टाऊन सेलीब्रीटींनी होळी साजरी करत आपल्या फॅन्सनाही होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. अनेक सेलीब्रीटी कलाकार होळी खेळताना दिसले. आरती सिंग व सोनाक्षी सिन्हाने आज लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली.

याशिवाय १३ मार्चला होळीही साजरी करण्यात आली. बाँलिवूड कलाकारांच्या घरीही होलीका हदन करण्यात आले. बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या घरी होलीका दहन झाले. त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते. या होळीचे काही फोटो श्वेता बच्चन व नव्या नवेली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कोणत्या कलाकाराने कशी होळी साजरी केली ते आपण पाहूयात...
सोनाक्षी सिन्हा- लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाने ही पहिलीच होळी साजरी केली. तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत ती रंगात भिजलेली दिसत आहे. तिचा नवरा झहीर इक्बाल होळी खेळताना तिच्यासोबत का दिसला नाही, हे तिने सांगितले.
कार्तिक आर्यन- कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तो विजयाचे चिन्ह दाखवत आहे. दुसऱ्या फोटोत तो होळीजवळ हात जोडून उभा आहे. हे फोटो शेअर करताना त्याने हॅप्पी होली असे लिहले आहे.
अंगद बेदी- अंगद बेदीचा हातात गण घेऊन चाललेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हातात पिचकारी घेऊन अंगद बेदी यांनी रंगपंचमी व होळी साजरी केली. त्याच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
कृती सेनन- कृती सेननने होळीचे काही फोटो शेअर केले आहेत. तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता धनुषही होळी साजरी करताना दिसत आहे. या होळीला कृतीने चांगलीच धमाले केल्याचे सांगितले जात आहे.
वरुण धवन- वरुण धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो मनीष पाँल सोबत मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओत हे दोन्ही स्टार मस्तीत होळी साजरी करताना दिसत आहेत.












Click it and Unblock the Notifications