Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Happy Birthday shahrukh :शाहरुख खानचा आज वाढदिवस, जाणून घ्या किंग खानच्या आयुष्यातील 'ते' 5 मोठे वाद

Happy Birthday shahrukh khan king khan's 5 biggest controversies : बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खान आज (२ नोव्हेंबर २०२५) आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. पडद्यावर प्रेमळ आणि शांत भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानचे व्यक्तिगत आयुष्य मात्र अनेकदा वादग्रस्त ठरले आहे. आपल्या कामामुळे आणि विनम्र स्वभावामुळे तो नेहमी चर्चेत असतोच, पण काही वेळा त्याच्या विधानांमुळे किंवा कृत्यांमुळे त्याला टीकेचे धनी व्हावे लागले.

वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया शाहरुख खानच्या आयुष्यातील ते ५ मोठे आणि गाजलेले वाद, ज्यामुळे सुपरस्टारच्या जीवनात मोठा गदारोळ झाला होता.

Happy Birth day shahrukh khan

१. पाकिस्तान आणि हाफिज सईदचा प्रस्ताव

एका वक्तव्यानंतर शाहरुख खानवर 'भारत विरोधी' असल्याचा आरोप काही लोकांनी केला होता. काही राजकीय नेत्यांनी त्याला पाकिस्तानचा समर्थक म्हटले. याच दरम्यान, अत्यंत वादग्रस्त ठरलेली घटना म्हणजे, दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदने शाहरुख खानला पाकिस्तानात येऊन 'शांततेत राहण्याचे' निमंत्रण दिले होते. मात्र, शाहरुख खानने हे निमंत्रण तत्काळ फेटाळून लावले आणि आपले हृदय आणि आत्मा पूर्णपणे भारताशी जोडलेले आहेत, असे ठामपणे सांगितले.

Take a Poll

२. 'IPL' आणि 'माय नेम इज खान' सिनेमाचा विरोध

शाहरुख खान इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील 'कोलकाता नाइट रायडर्स' (KKR) या संघाचा सह-मालक आहे. आयपीएलच्या तिसऱ्या पर्वात त्याने पाकिस्तानी खेळाडूंना संघात घेण्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले होते. या वक्तव्यावर शिवसेना पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आणि कडक विरोध दर्शवला. या विरोधामुळे त्याच्या आगामी 'माय नेम इज खान' (My Name Is Khan) या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची धमकी देण्यात आली होती. नंतर शाहरुखने ट्विटरच्या माध्यमातून आपला उद्देश कोणालाही दुखावण्याचा नव्हता, अशी स्पष्टीकरण दिले होते.

३. वानखेडे स्टेडियममधील गैरवर्तन आणि बंदी

२०१२ मध्ये शाहरुख खान एका मोठ्या वादात सापडला. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने शाहरुखवर वानखेडे स्टेडियममध्ये सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर MCA ने कठोर पाऊल उचलत शाहरुख खानवर पाच वर्षांसाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे मोठा गदारोळ माजला होता.

४. शिरीष कुंदरसोबत भांडण, वाद

बॉलिवूडमध्ये आणखी एक चर्चा झालेला वाद म्हणजे, दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर याच्यासोबत शाहरुख खानचे झालेले भांडण. शिरीषने शाहरुखसोबत हाणामारी केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा वाद बराच गाजला. मात्र, नंतर फराह खान आणि तिचा भाऊ साजिद खान यांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणला.

५. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: अटक ते क्लीन चिट (२०२१)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरण अटक ते क्लिन चीट हा वाद शाहरुख खानच्या आयुष्यातील सर्वात मोठा वैयक्तिक संकटकाळ ठरला. २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या पथकाने धाड टाकली. या धाडीचे नेतृत्व तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केले होते. या छाप्यात आर्यन खानला त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. ड्रग्ज बाळगणे आणि त्याचे सेवन करण्याच्या आरोपावरून आर्यनला सुमारे २५ दिवस तुरुंगात राहावे लागले होते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+