अभिनेता अल्लू अर्जूनला प्रेमात मिळाला होता धोका, अशी आहे पुष्पाभाऊची लव्ह स्टोरी
Happy Birthday Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या अनोख्या डान्स स्टाइल आणि जबरदस्त अभिनयाने इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे. आज 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुन त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा' या चित्रपटाद्वारे अल्लू आता संपूर्ण देशभरात स्टार बनला आहे. संपूर्ण देशभरात त्याचे मोठे चाहते आहेत.
अल्लूच्या 'पुष्पा 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. दरम्यान अल्लू अर्जुन मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. त्याच वेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत खूप खाजगी राहतो.

अल्लूने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी विवाह केला आहे. त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे सुंदर नाते पाहून चाहत्यांनी त्याला फॅमिली मॅनचा टॅगही दिला आहे. दरम्यान एकेकाळी अल्लू अर्जूनचे नाव एका अभिनेत्रीशी जोडले गेले होते. त्यावेळी तो या नात्यासाठी खूप सिरीयस होता, असं बोललं जातं. तसेच त्यावेळी त्यांच्यातील नातं तुटल्याने खूप बैचेन झाला होता, असं म्हटलं जातं.
रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने अभिनेत्री नेहा शर्माला डेट केले आहे. अल्लू नेहाबद्दल नात्यासाठी खूप सिरियस होता. त्यावेळी नेहाही अल्लूच्या प्रेमात वेडी झाली होती. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हते. दरम्यान अभिनेता राम चरण नेहाच्या आयुष्यात आला. राम चरणमुळे नेहा अल्लूपासून वेगळी झाली असे सांगण्यात येत आहे.
अल्लू अर्जुन आणि राम चरणचा वाद
बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी नेहाने साऊथमध्ये आपलं नशिब आजमावलं होतं. नेहा शर्माने 2007 मध्ये आलेल्या 'चिरुथा' चित्रपटात काम केले होते. यानंतर राम चरणसोबतच्या वाढत्या जवळकीच्या बातम्या समोर आल्या. नेहा आणि राम चरण यांचे लग्न झालं आणि नंतर दोघेही हनिमूनला गेले, असा दावाही करण्यात आला होता. यानंतर राम चरण यांनी या बातम्यांना केवळ अफवा म्हटलं होतं. त्यावेळी अल्लू अर्जुनचा राम चरणशी जोरदार वाद झाला होता, असे वृत्त देखील आले होते .












Click it and Unblock the Notifications