Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऐकावं ते नवलंच..! गुणरत्न सदावर्तेंनी बीग बाँसमध्ये आणला गाढव; 'पेटा'चं निर्माता आणि सलमानला पत्र

सध्या रियलिटी शो असलेल्या हिंदी बिग बॉसचा 18 वा सिझन सुरु आहे. प्रसिद्ध हिंदी अभिनेता सलमान खान हा कार्यक्रम होस्ट करतोय. सलमासोबत यावेळी न्यारा बॅनर्जी, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, चुम दरंग, रजत दलाल, मुस्कान बामणे, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंग, विरल भाभी, ॲलिस कौशिक आणि वकील गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक असणार आहेत.

रविवारी या कार्यक्रमात वकील गुणरत्न सदावर्ते यांची स्पर्धक म्हणून एन्ट्री झाली. त्यांनी आपल्यासोबत त्यांच्या घरातील गाढव नेला. आता हेच गाढव, सध्या बीग बाँसच्या बागेत बांधण्यात आले आहे. बीग बाँसचे स्पर्धक त्याला चारा-पाणी देतात. मात्र या प्रकारानंतर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा संघटनेने थेट या मालिकेचा निर्माता आणि होस्ट असलेल्या सलमान खानला पत्र लिहीले आहे.

Gunaratna Sadavarte

पेटाने लिहीले सलमान खानला पत्र

पेटा इंडियाने सलमान खान आणि रिॲलिटी शो बिग बॉसच्या निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशी विनंती पत्रातून केली आहे. 'बिग बॉस 18' मध्ये एका गाढवाला स्पर्धक म्हणून आणण्यात आले आहे. त्याचे नाव गधराज आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळून या गाढवाचा सांभाळ करावा लागतो. या कृतीला ​पेटाने आक्षेप घेतलाय. या कार्यक्रमामध्ये मनोरंजनासाठी कोणत्याही प्राण्याचा वापर करु नये, असे पेटाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. गाढवाच्या वापर टाळला तर, प्राण्यांवर दबाव येणार नाही. प्रेक्षकांसाठी ही कृती आदर्श ठरेल, असेही पत्रात म्हटले आहे. हा गाढव पेटाकडे सोपवावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. बिग बॉसच्या शोमधून सुटका झालेल्या गाढवाला आम्ही अभयारण्यात पाठवू. त्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे चाहतेही खूश होतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदावर्तेंनी का आणले गाढव?

गाढवाच्या दुधावर संशोधन करत असल्याचा वकील गुणरत्न सदावर्ते यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात एक गाढवही पाळला आहे. आता गुणरत्न सदावर्ते हे बीग बाँसमध्ये स्पर्धक म्हणून गेले आहेत. तेथे त्यांनी आपल्यासोबत या गधराजला नेले आहे. गाढव स्पर्धेत गेल्यामुळे एकच चर्चा वाढली. आता पेटा या संघटनेनेही याबाबत सलमान खानला पत्र पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे. 'बिग बॉस हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. परंतु प्राण्यांचा वापर करुन मनोरंजन करणे चुकीचे आहे, असे पेटाचे म्हणणे आहे. गाढवसाठी शोच्या सेटवर लावण्यात आलेले लाईट, त्या ठिकाणी होणारा आवाज हे सर्व भीतीदायक आहेत. कोणत्याही टीव्ही शोमध्ये प्राण्यांचा वापर करु नये. गाढव हा एक सामाजिक प्राणी आहे. तो त्यांच्या कळपात राहतो. सदावर्ते गाढवाच्या दुधावर संशोधन शोमध्ये करत असल्याचा दावा करतात. परंतु गाढवाचे दूध फक्त त्याच्या मुलांसाठीच असते, असेही पेटाने पत्रात नमूद केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+