गोविंदाची पत्नी सुनीता हिने 6 महिन्यांपूर्वी घटस्फोट मागितला होता, वकिलाचा मोठा खुलासा
Govinda Sunita Ahuja: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहूजा यांच्यात मागील दोन दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमूळे सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. त्यानंतर त्यानंतर बॉलिवूड वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.
रिपोर्ट्सनुसार गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. हे जोडपं लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाचा गोविंदाचे वकील आणि फॅमिली फ्रेंड ललित बिंडल यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ललित यांनी इंडिया टुडेशी बोलताना खुलासा केला की, सुनीताने काही गैरसमजांमुळे 6 महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण आता या जोडप्यामध्ये सुरु असलेले त्यांचे मतभेद मिटले आहेत. दोघेही एकत्र आनंदी आहेत. गोविंदा आणि सुनिता हे दोघेही नवीन वर्षात नेपाळला गेले होते. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. अशा गोष्टी जोडप्यामध्ये घडत राहतात. त्यांचे नाते घट्ट आहे. ते नेहमीच एकत्र असतील.
गोविंदा आणि सुनिता हे दोघे वेगवेगळ्या अपार्टमेंट्समध्ये राहतात हे वृत्त ही चुकीचं असल्याचं ललित यांनी म्हटलं आहे. कारण गोविंदा खासदार झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी गोविंदाने एक वेगळ घर खरेदी केलं होतं. हा बंगला त्यांच्या अपार्टमेंट्सच्या अगदी समोर आहे. याच बंगल्यात गोविंदा आपल्या कार्यालयीन कामकाज आणि मिटींग ही करतात. त्यावेळी अनेकवेळा सर्व कामकाज संपवून गोविंदा या ठिकाणी झोपतात. मात्र दोघांच्या नात्यात कोणताही दुरावा नसल्याचं ललित यांनी म्हटलं आहे.
पॉडकास्ट आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुनीता यांच्या अपूर्ण विधानांमुळे या सर्व गोष्टींना गती मिळाली आहे, असं ललित यांनी म्हटलं आहे. लोकांनी त्यांच्या सोयीनुसार मुद्दे उचलले आणि त्यांचा वापर केला. पुढे बोलताना ललित यांनी म्हटलं आहे की, सुनिता म्हणतेय - मला गोविंदासारखा नवरा नको आहे. मग ती म्हणते की मला गोविंदासारखा मुलगा हवा आहे.
जेव्हा ती म्हणते- गोविंदा त्याच्या व्हॅलेंटाईनसोबत आहे. तर सुनीताला म्हणायचं होतं की, गोविंदा त्याच्या कामात व्यस्त आहे. पण लोक या जोडप्याबद्दल नकारात्मक बोलत आहेत. ते एकत्र असताना. मी तुम्हाला खात्री देतो की, ते नेहमीच एकत्र असतील. गोविंदा आणि सुनीता यांच्यात घटस्फोट होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न 1987 मध्ये झाले होते. लग्नानंतरही गोविंदाचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नात अडचणी आल्या. दरम्यान अफेअरच्या बातम्या असूनही सुनीता या गोविंदाला सोडून गेल्या नाहीत तर त्या अजूनही 37 वर्षांचे वैवाहिक जीवन टिकवून आहे. सुनीता आणि गोविंदा यांना यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा अशी दोन मुले आहेत.












Click it and Unblock the Notifications