गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चेत ग्रे डिव्होर्स ट्रेंड करतोय, काय आहे ग्रे डिव्होर्स घ्या जाणू
Govinda Sunita Ahuja: बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या राजकीय आणि व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. दरम्यान गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. जर रिपोर्टवर विश्वास ठेवला तर 37 वर्षांच्या लग्नानंतर दोघे घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर त्यानंतर बॉलिवूड वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. रिपोर्ट्सनुसार गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याच्या आणि सुनीता यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तथापि, या जोडप्याने अद्याप घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

आता गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यानंतर असे म्हटले जात आहे की दोघेही ग्रे घटस्फोट घेणार आहेत. अशा परिस्थितीत, जाणून घेऊया ग्रे घटस्फोट म्हणजे नेमके काय आणि त्याचे वय काय आहे.
ग्रे घटस्फोट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या जोडप्याचे वय 50 ओलांडते किंवा त्यांचे लग्न बराच काळ झाले आहे. लग्नाच्या 15 ते 20 वर्षांनी सामान्यतः ग्रे घटस्फोट घेतला जातो. या घटस्फोटामागील खरे कारण म्हणजे जोडप्यातील वाढती मतभेद किंवा एकटेपणा जाणवणे. अशा परिस्थितीत 37 वर्षांच्या लग्नानंतर गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट घेण्याचा निर्णय हा ग्रे घटस्फोट मानला जाईल. ग्रे घटस्फोट आणि सामान्य घटस्फोटमध्ये फारसं काही अंतर नाही. मात्र एखादं कपल दीर्घ काळानंतर त्यांच्यात मतभेद होऊन घेतला जाणार घटस्फोट म्हणजे ग्रे घटस्फोट असं म्हटलं जातं.
काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीदरम्यान सुनीता आहुजा म्हणाल्या होत्या की, त्या आणि गोविंदा बऱ्याच काळापासून एकत्र राहत नाहीत. सुनीता यांच्या मते, त्या कमी लोकांच्यात राहायला त्यांना जास्त आवडते तर गोविंदाला पार्टी करायला आवडते. म्हणून, गोविंदा त्याच्या बंगल्यात वेगळा राहतो, तर सुनीता तिच्या मुलांसह राहते.
गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न 1987 मध्ये झाले होते. लग्नानंतरही गोविंदाचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नात अडचणी आल्या. दरम्यान अफेअरच्या बातम्या असूनही सुनीता या गोविंदाला सोडून गेल्या नाहीत तर त्या अजूनही 37 वर्षांचे वैवाहिक जीवन टिकवून आहे. सुनीता आणि गोविंदा यांना यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा अशी दोन मुले आहेत. पण मागील दोन दिवसापासून त्यांच्यात घटस्फोट होणार अश्या बातम्या सुरु आहेत. मात्र या दोघांकडून याबाबत अद्याप कोणतेही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications