नातवंड खेळवण्याच्या वयात गोविंदाचं अफेअर? सुनीता आहुजांनी स्पष्टचं सांगितलं….

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचं वैवाहिक नातं गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या ३८ वर्षांच्या सहजीवनाविषयी अनेक गॉसिप्स सोशल मीडियावर फिरत होत्या. घटस्फोटाच्या चर्चांपासून ते गोविंदाच्या नव्या नात्यापर्यंत.

govinda sunita ahuja affair rumours response

विशेषतः, काही महिन्यांपूर्वी गोविंदा एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. ती अभिनेत्री वयाने ३० च्या आसपास असल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर या सर्व चर्चांवर सुनीता आहुजांनी मौन सोडत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

"अफेअरचं हे वय आहे का?" - सुनीता आहुजा

सुनीता आहुजा यांनी 'टाइम्स नाऊ' ला दिलेल्या मुलाखतीत या अफवांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "होय, या गोष्टी मी देखील ऐकल्या आहेत. पण त्या सर्व निराधार आणि निरर्थक आहेत. गोविंदा आता ६२ वर्षांचा आहे. तो आजोबा होण्याच्या वयात आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "आमची मुलगी टीना लग्नाच्या वयात आहे, आणि मुलगा यशला लवकरच मुलं होतील. अशा वेळी अशा अफवा खूपच हास्यास्पद वाटतात."

३८ वर्षांचं बंधन - अफवांना पुन्हा एकदा उत्तर

गोविंदा आणि सुनीता यांनी ११ मार्च १९८७ रोजी विवाह केला होता. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला ३८ वर्षं पूर्ण झाली आहेत. टीना आणि यशवर्धन अशी त्यांची दोन अपत्ये आहेत. काही महिन्यांपूर्वी, दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याची अफवा पसरली होती, तसेच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचाही दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता.

मात्र सुनीता यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत सांगितलं की, "आमचं नातं आजही तसंच आहे. या अफवांचं वास्तवाशी काहीही देणंघेणं नाही."

व्हायरल मुलाखतीमुळे चर्चेला पूर्णविराम

सुनीता आहुजांनी दिलेली ही मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, चाहत्यांनी देखील त्यांच्या मताला समर्थन दिलं आहे. अनेकांनी या अफवांचा समाचार घेत, गोविंदाच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+