Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गोविंदाचे सेक्रेटरी शशी प्रभू यांचे निधन, अंत्यसंस्कारावेळी मित्राला निरोप देताना अभिनेत्याला अश्रू

Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील काही दिवसांपुर्वी अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या आणि आता त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे.

गोविंदाचे सेक्रेटरी शशी प्रभू यांचे निधन

आपल्या खास व्यक्तीला गमावल्याचे दुःख गोविंदाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. गोविंदाचे सेक्रेटरी शशी प्रभू यांचे निधन झाल्याची बातमी आहे. अभिनेता गोविंदा त्याच्या सेक्रेटरीच्या अंत्यसंस्काराला पोहोचला होता. त्याठिकाणी अभिनेत्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. गोविंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

govinda secretary shashi prabhu passed away

जवळच्या मित्राच्या जाण्याने गोविंदा दुःखी

शशी प्रभू बराच काळ गोविंदासोबत होते. दोघेही व्यावसायिक पातळीवर खूप चांगले मित्र होते. गोविंदाच्या संघर्षाच्या काळात शशी प्रभू त्याच्यासोबत होते. ते गोविंदाला खूप पाठिंबा द्यायचे. अशा परिस्थितीत गोविंदा त्याच्या जवळच्या मित्राच्या जाण्याने खूप दुःखी आहे.

शशी प्रभूच्या निधनाने गोविंदा ढसाढसा रडला

गोविंदाला त्याचे सेक्रेटरी शशी प्रभू यांच्या निधनाची माहिती मिळताच तो तातडीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तेथे पोहोचला. यावेळी गोविंदा खूप दुःखी दिसत होता. बऱ्याच वेळा तो ढसाढसा रडताना व्हिडीओत दिसत आहे.

घटस्फोटाच्या चर्चेच्या दरम्यान गोविंदाच्या सेक्रेटरीने केला होता बचाव

अलिकडेच जेव्हा गोविंदाच्या घटस्फोटाची बातम्या चर्चेत होत्या तेव्हा सेक्रेटरी शशी प्रभू यांनीच त्याचा बचाव केला होता. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात कोणताही दुरावा नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. दोघांमधील संबंध चांगले आहेत आणि घटस्फोट होणार नसल्याचं त्यांनी सांगितले होते.

गोविंदाच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत होत्या. अशा परिस्थितीत गोविंदाचे वकील आणि सेक्रेटरी शशी प्रभू त्याची बाजू मांडताना दिसले. दरम्यान सेक्रेटरीच्या मृत्यूने गोविंदा धक्का बसला आहे.

हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते

मीडिया रिपोर्ट्सनुसार गोविंदाचे मित्र आणि सेक्रेटरी शशी प्रभू यांना हृदयविकाराचा त्रास होता. अलिकडेच त्यांची बायपास सर्जरीही झाली. पण लोक या मृत्यूमागे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा रचताना दिसत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+