घटस्फोटाच्या चर्चांबाबत गोविंदाने सोडले मौन; पत्नी सुनीता घटस्फोटासाठी आग्रही, तर...
चित्रपट अभिनेता गोविंदा व पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या सुरु आहेत. या दोघांचा संसार आता शेवटच्या टप्प्यावर असल्याचे सांगितले जात आहे. गोविंदा व सुनीता यांचा ३७ वर्षांचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर असल्याच्या बातम्या सुरु असल्या तरी, या दोघांकडून याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र काही बातम्यांच्या हवाल्यावरुन गोविंदाला आपला संसार पुन्हा सावरायचा असल्याचे बोलले जात आहे.

गोविंदा काय म्हणाला?
ई-टाईम्सच्या वृत्तानुसार गोविंदाने घटस्फोटाच्या चर्चेवर उत्तर दिले. तो म्हणाला की, सध्या व्यावसायिक चर्चा सुरु आहे. मी माझ्या कामात व्यस्त आहे. मी माझा चित्रपट सुरु करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, असे म्हणत गोविंदाने या प्रश्नाला सविस्तर बगल दिली. दुसरीकडे गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा म्हणाले की, कुटुंबातील एका सदस्याने एक विधान केल्यापासून या जोडप्यामध्ये काही वाद आहेत. पण ते जास्त नाहीत. गोविंदा त्याचा चित्रपट सुरु करत आहे. हा वाद सोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
घटस्फोटाबाबत सुनीता आग्रही?
व्यवस्थापकाच्या म्हणण्यांनुसार कुटुंबातील एका सदस्याच्या विधानानंतर गोविंदा व सुनीता यांच्यात वाद सुरु झाले. तर काही मिडिया हाऊसच्या म्हणण्यांनुसार एका मराठी अभिनेत्रीचे गोविंदाबरोबर अफेअर सुरु असल्याच्या चर्चांमुळे पत्नी सुनीता नाराज आहे. झूमच्या रिपोर्टनुसार सुनीता यांनाच घटस्फोट हवाय. तर विवेक ललवानी यांच्या रिपोर्टनुसार गोविंदा त्याच्या पत्नीकडे चुक सुधारण्याची संधी मागत आहे. मात्र सुनीता घटस्फोटाच्या मुद्यावर कायम असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
काय म्हणाली होती सुनीता?
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका वृत्तानुसार सुनीता या गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलांसह वेगळी राहत आहे. तर गोविंदा हा वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. एका मुलाखतीत सुनीता सांगितले होते की, पूर्वी तिला तिच्या लग्नाबाबत काळजी वाटायची. मात्र आता तिने अशी काळजी करण्याचे सोडून दिले आहे. मी माझा मुलगा व माझी मुलगी वेगळे राहतो, असं सुनीतानंही त्या मुलाखतीत सांगितलं होतं.












Click it and Unblock the Notifications