मालकीण असावी तर अशी, गौरी खानचा स्टाफप्रती प्रेमळ निर्णय
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी, प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आणि फिल्म प्रोड्यूसर गौरी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मात्र यावेळी कारण तिची स्टाईल किंवा डिझाईन नव्हे, तर तिच्या स्टाफप्रती असलेली जबाबदारी आणि विचारशीलता आहे. मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील पॉश पंकज सोसायटीमध्ये गौरीनं नुकताच एक आलिशान फ्लॅट भाड्यानं घेतला आहे - तेही स्वतःसाठी नव्हे, तर तिच्या स्टाफसाठी.
शाहरुख-गौरी सध्या भाड्याच्या घरी, स्टाफसाठी वेगळा फ्लॅट
सध्या शाहरुख खान आणि गौरी खान त्यांच्या 'मन्नत' या प्रसिद्ध बंगल्याच्या नूतनीकरणामुळे एका भाड्याच्या डुप्लेक्समध्ये मुलांसह राहत आहेत. अशा वेळी त्यांनी त्यांच्या स्टाफसाठी केवळ 100 मीटर अंतरावर असलेला स्वतंत्र फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. हा फ्लॅट चौथ्या मजल्यावर असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे 725 चौरस फूट आहे.
भाड्याचा आकडा ऐकून थक्क व्हाल
गौरीनं हा फ्लॅट संजय किशोर रमानी यांच्याकडून दरमहा ₹1.35 लाख भाड्याने घेतला आहे. म्हणजेच, एका वर्षासाठी सुमारे ₹16.2 लाख खर्च केला जाणार आहे. यासाठी तिनं ₹4.05 लाख इतकं सुरक्षा ठेव (security deposit) देखील दिलं आहे. हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला असून, प्रत्येक वर्षी भाड्यात 5% वाढ होणार आहे.
शाहरुख खानचं 8.67 कोटींचं भाड्याचं घर
एप्रिल महिन्यातच शाहरुख खाननं खार येथील पाली हिल भागात दोन डुप्लेक्स फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्यानं घेतले आहेत. यासाठी तो एकूण ₹8.67 कोटी इतकं भाडं भरणार आहे. या फ्लॅट्सपैकी एका साठी शाहरुख ₹11.54 लाख दरमहा देतो, तर दुसऱ्यासाठी ₹12.61 लाख.
मालकीण असावी तर अशी!
गौरी खानच्या या निर्णयामुळे तिच्या संवेदनशीलतेचे आणि स्टाफप्रती असलेल्या आदरभावाचे कौतुक होत आहे. सामान्यतः सेलिब्रिटींच्या स्टाफला फारसं महत्त्व दिलं जात नाही, पण गौरीनं त्यांच्या राहणीमानाची जबाबदारी घेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि दर्जेदार निवासाची सोय करून एक आदर्श मालकीण म्हणून उदाहरण ठेवले आहे.












Click it and Unblock the Notifications