Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Fathers day 2025 celebrity dad हे 4 अभिनेते रिल्स नाही रियल लाईफमध्ये आहेत त्यांच्या मुलांची प्रेरणा

Fathers day 2025 celebrity dad : मुव्ही, सिरीयल्स आणि रिल्समध्ये जे हिरो दिसतात त्यांचे रियल हिरो त्यांचे वडिल आहेत. अभिनेता कितीही मोठा झाला मग तो अमिताभ बच्चन असो की, अजय देवगण सर्वांसाठी त्याचे वडिल हे प्रेरणास्थान आणि हिरो असतात.

मुलगा कितीही मोठा झाला तर त्यापेक्षाही एक मोठा माणूस असतो तो म्हणजे बाप...देशाच्या सर्वोच्च पदापासून ते तळागळातील व्यक्तींच्या आयुष्यात सागरासारखा अथांग आणि मुलांवर संकट आल्यास समुद्रांच्या लाटासारखा तुफान बाप असतो. तो प्रत्येकाच्या आयु्ष्यातील रियल हिरो तर आहेच पण प्रेरणेचा अखंड झरा असतो.

Fathers day 2025 celebrity dad


अभिनेत्यांच्या मुलांसाठी त्यांचे वडिल केवळ रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही चांगले वडील बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच आज आपण 15 जून 2025५ रोजी फादर्स डेनिमित्त सेलिब्रिटी वडिलांची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी केवळ रील लाईफमध्ये वडिलांचे व्यक्तिरेखा जिवंत केली नाही तर खऱ्या आयुष्यात एक जबाबदार, संवेदनशील आणि प्रेरणादायी वडील बनून लोकांची मने जिंकली.

अभिनेत्यांचे हिरो..Fathers day 2025 celebrity dads

1. शाहरुख खान - बाॅलीवूडचा आघाडीचा नायक आणि प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याला किंग खान या नावाने ओळखले जाते. तो त्यांच्या मुलांचा सर्वात चांगला मित्र आहे. शाहरुख खान हा केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर तो एक उत्तम बापही आहे. आर्यन, सुहाना आणि अबरामसोबतचे त्याचे नाते मैत्रीपेक्षा कमी नाही. तो मुलांसोबत अगदी दिलखुलास असतो. अनेकदा सोशल मीडियावर तो त्याच्या मुलांसोबत घालवलेले खास क्षण शेअर करतो. शाहरुख खानचा असा विश्वास आहे की वडील होणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे.

Fathers day 2025 celebrity dad

2. सैफ अली खान - आधुनिक वडील पण शिस्तप्रिय सैफ अली खान चार मुलांचा पिता आहे. तो सारा, इब्राहिम, तैमूर आणि जेह यांना समान प्रेम देतो. त्याने प्रत्येक मुलाशी वेगळ्या प्रकारचे नाते निर्माण केले आहे. सारा आणि इब्राहिमशी त्याचे नाते खूप मैत्रीपूर्ण आहे. त्याच वेळी, तो तैमूर आणि जेहसाठी वेळ काढायला विसरत नाही. सैफ हा आधुनिक आणि व्यावहारिक पित्याचे उदाहरण आहे.

Fathers day 2025 celebrity dad

3. अजय देवगण - कमी बोलतो पण मुलांसाठी जास्त जबाबदारी घेतो. अजय देवगण त्याच्या शांत स्वभावासाठी आणि गंभीर शैलीसाठी ओळखला जातो आणि हे त्याच्या वडिलांच्या भूमिकेतूनही दिसून येते. तो मुलगी न्यासा आणि मुलगा युगसाठी एक संरक्षक आणि प्रेरणादायी पिता आहे. त्याने अनेक वेळा म्हटले आहे की त्याच्या मुलांचा आनंद हेच त्याचे खरे यश आहे.

Fathers day 2025 celebrity dad

4. . हृतिक रोशन - त्याच्या मुलांचा खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो असलेल्या हृतिक रोशनने त्याची पत्नी सुझान खानशी घटस्फोट घेतला असेल, पण तो त्याच्या दोन्ही मुलांसोबत, हृहान आणि हृदानसोबत वेळ घालवायला विसरत नाही. तो त्याच्या मुलांसोबत सुंदर क्षण शेअर करतो. हृतिक रोशन त्याच्या मुलांसोबत प्रवास करतो, एकत्र खेळतो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव देतो जी एका वडिलांची सर्वात मोठी जबाबदारी असते.

Fathers day 2025 celebrity dad

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+