प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे निधन; 15 दिवसांपूर्वीच केला होता शेवटचा शो, कशामुळे झाला मृत्यू
Rohit Bal passed away : बॉलिवूडसह फिल्म जगतातील सर्वपरिचित असलेले प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
रोहित बल गेल्या वर्षभरापासून हृदयविकाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना नोव्हेंबर 2023 मध्ये गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. त्यानंतर ते बराच काळ फॅशन जगतापासून अलिप्त होते. तर त्यानंतर 2024 च्या मध्ये पुन्हा त्यांनी फॅशन इंडस्ट्रीत पुनरागमन केले. तर पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीतील लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये सहभागी घेतला होता, हाच त्यांचा शेवटचा फॅशन शो राहिला. तर आज रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

रोहित बल यांनी करिअरची सुरुवात कशी केली?
रोहित बल हे फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. रोहित यांचा जन्म 8 मे 1961 रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण श्रीनगरमधून केले. नंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झाले. येथे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. रोहित यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन कोर्स केला आहे. 1986 मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत ऑर्किड ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यानंतर 1990 मध्ये रोहित यांनी त्याचे कलेक्शन स्वतंत्रपणे लाँच केले. खादी ग्राम उद्योगाशीही त्यांनी सहकार्य केले. 'कौन बनेगा करोडपती' या क्विझ शोसाठी त्याने कॉस्च्युम डिझाइन केले होते. रोहित यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींशी चांगले संबंध होते. ते आणि त्याच्या डिझाइन्स फिल्म स्टार्समध्ये प्रसिद्ध होत्या.
रोहितने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद येथे त्याचे स्टोअर उघडले होते. कॉस्च्युमनंतर त्यांनी ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात प्रवेश केला. रोहित कमळ आणि मोराच्या डिझाइनसाठी खास ओळखला जात असे. ते मुख्यतः मखमली आणि ब्रोकेडसारखे उच्च दर्जाचे कापड वापरत असत. यामुळे त्याने बनवलेले आउटफिट्स रॉयल दिसत होते. रोहितचे आंतरराष्ट्रीय ग्राहकही होते. यामध्ये सिंडी क्रॉफर्ड, पामेला अँडरसन, उमा थर्मन या ग्राहकांचा देखील समावेश होता.












Click it and Unblock the Notifications