फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बनणार पप्पा; पत्नी शिबानी प्रेग्नंट, खरे काय खोटे काय..?

बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते फरहान अख्तरच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हालणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. त्यांची पत्नी शिबानी दांडेकर गर्भवती आहे. दोघांनीही 3 वर्षांपूर्वी कोणताही धार्मिक विधी न करता लग्न केले होते. फरहानचे हे दुसरे लग्न होते. तो यापूर्वी दोन मुलींचा बापही आहे. आता तिसऱ्यांदा तो बाप बनणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींनी या बातम्या खोट्या असल्याचा दावा केला आहे.

Farhan Akhtar to become a father again

शिबानी गर्भवती?

काही मीडियाच्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकर ही गर्भवती असून ती त्यांच्या पहिल्या मुलाची आई होणार आहे. मात्र, शिबानी 44 वर्षांची असून, या वयात नैसर्गिकरित्या आई बनणे शक्य नसल्याचे अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे ते सरोगसी किंवा आयव्हीएफ तंत्राद्वारे पालक बनण्याची शक्यता आहे. या जोडप्याने अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.

फरहानची दुसरी पत्नी

फरहान अख्तरने हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न 2000 साली अधुना भाबानीसोबत झाले होते. याआधी दोघेही ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची पहिली भेट फरहानच्या दिग्दर्शनातील डेब्यू सिनेमा 'दिल चाहता है' दरम्यान झाली होती. या चित्रपटाद्वारे अधुनाने बॉलिवूड हेअरस्टाइलिस्ट म्हणून डेब्यू केले होते. या दोघांना शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. 21 जानेवारी 2016 रोजी त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली. लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांचे नाते तुटले. एप्रिल 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे आहे.

शिबानी दुसरी पत्नी

एका वर्षानंतर 2018 मध्ये फरहानने व्हीजे शिबानी दांडेकरला डेट करायला सुरुवात केली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय त्यांनी लग्न केले. तसेच 21 फेब्रुवारीला वांद्रे येथे रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. फरहान मुस्लिम आहे आणि शिबानी हिंदू आहे. फरहान 51 वर्षांचा आहे आणि शिबानी 44 वर्षांची आहे. दोघांच्या वयात सात वर्षांचा फरक आहे. लग्नाच्या ३ वर्षानंतर शिबानी प्रेग्नेंसी झाल्याची बातमी आहे.

शबाना आझमींनी दावा खोडला

शिबानी दांडेकरच्या गरोदरपणाच्या वृत्तावर 'ई-टाइम्स'शी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या, 'हे अजिबात खरे नाही.' याचा अर्थ अभिनेत्री गर्भवती नाही. या केवळ अफवा होत्या ज्यांना आता कुटुंबातील सदस्यानेच स्पष्ट केले आहे. शबाना आझमी यांनी शिबानी गर्भवती असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+