"आमिरखानचं डोकं ठिकाणावर नव्हतं!" फैसल खानचे गंभीर आरोप, बिग बाॅसमधून हटवणं ते अनैतिक संबध वाचा दावे
Faisal Khan's allegations on Aamir Khan : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान सध्या अडचणीत सापडला आहे, कारण यावेळी त्याच्यावर चक्क भावाकडूनच आरोप झाले आहेत. त्याचा भाऊ फैसल खान याने आमिर आणि कुटुंब बद्दल आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. आमिर खानचे अनैतिक संबंध होते आणि त्यातून एक मूल जन्माला आले असे जाहीररित्या फैसल खानने सांगितले आहे, त्यामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे भाऊबंदीकीचेही चित्र दिसत आहे.
धक्कादायक खुल्या खुलासे केल्यानंतर आता अभिनेता फैसल खान हा चर्चेत आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याने आमिर खान आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांसोबत नात तोडण्याची घोषणा केली आहे, यादरम्यान त्यांना आमिर खानवर आरोप लावलेय नेमके त्यांनी काय आरोप लावले हे आपण चार मुद्द्यात समजून घेऊया.

"आमिरचे डोके खराब झाले होते!" - फैसल खान
अभिनेता आणि दिग्दर्शक असलेला फैसल खान हा आमिर खान यांचा भाऊ आहे. त्याची 2002 मध्ये लग्न झाले, त्यानंतर मात्र त्याचवर्षी त्याचा घटस्फोट झाला. कुटुंबाकडून त्याला दुसऱ्यांदा लग्न करण्याचा दबाव आला होता, त्यानंतर त्याने कुटुंबातील सदस्यांना पत्र लिहून खराब लग्नांची काही उदाहरणे दिली परंतु मानसिक संतुलन ठीक नाही असे समजून कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात केले आणि औषधे देण्यास सुरुवात केली असे फैजल खान म्हणाला. त्यान आरोप केला की,मला वाटते, आमिरचे डोके ठिकाणावर नव्हते आणि त्याने माझी आई, संतोष हेगडे आणि इम्तियाज यांचे ऐकून माझ्यासोबत हा प्रकार केला असे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे.
आमिरमुळे बिग बॉस मधून बाजूला केलं गेलं - फैसल खान
फैसलखानने हाही आरोप लावला आहे की, 2008 मध्ये बिग बॉसमध्ये त्याला चार लाख रुपये साईन अमाउंटवर ऑफर केली गेली होती, मात्र ही बाब आमिर खान याला कळाली आणि त्याने बिग बॉसमधून हटवण्यासाठी कारनामे केले. आता मी कायदेशीररित्या कुटुंबियांशी नाते तोडत आहे आणि या संदर्भात एका महिन्यात याचिका दाखल करणार आहे. फैसलने हेही सांगितले की, मी मानहानीचा दावा दाखल करणार नाही, कारण मला त्यांच्याकडून काहीही नकोय.
आमिर खानवर गंभीर आरोप
फैजल खानने केलेल्या दाव्यानुसार, आमिर खानचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याला एक 'अवैध' मूल (illegitimate child) देखील आहे. फैजलने जेसिका हाइन्सबद्दल जो दावा केला आहे, त्याचे मूळ २००५ सालच्या एका जुन्या अहवालात आहे. त्यावेळी एका मासिकाने असा दावा केला होता की, आमिर खानचे ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत प्रेमसंबंध होते. या अहवालात असाही दावा करण्यात आला होता की, आमिरने जेसिकाला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता, पण तिने तो मानला नाही. मात्र, आमिरने त्यावेळी हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळले होते.
फैसल खानच्या कुटुंबाची प्रतिक्रीया आली समोर
फैसलखानने आमिर खान आणि कुटुंबीयांवर जाहीररित्या खुले आरोप केले, यानंतर त्याच्या कुटुंबीयांची अधिकृत बाजू समोर आली आहे, आजतकनुसार, फैसल खानचे वक्तव्य आणि आरोप दुःखद आहेत, आमच्यासोबत हा प्रकार आताच नाही तर यापूर्वी घडलेला आहे, फैसलने काही घटना चुकीच्या पद्धतीने माध्यमांसमोर सांगितल्या. कुटुंबीयाने हे सांगितले की, फैसलशी निगडित प्रत्येक निर्णय कुटुंब आणि डॉक्टरांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला होता.












Click it and Unblock the Notifications