दिशा सालियानची आत्महत्या की हत्या? आदित्य ठाकरेंचा संबंध आहे का? मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा!
Disha Salian's suicide : बहुचर्चित दिशा सालियानचा मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्याने झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दिशावर बलात्कार किंवा हत्येचे सर्व आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.

दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने ८ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरेंवर भाजप नेते नितीश राणेंनी व्यक्तिशः आरोप केले होते.
- दिशा सालियन प्रकरणी गठीत एसआयटीच्या तपासात दिशावर लैंगिक किंवा शारीरिक हल्ल्याचे कोणतेही संकेत नाहीत असे दिसून आले आहे.
- दिशा तिच्या मृत्यूपूर्वी ती खूप मद्यधुंद होती, याची स्पष्टता कलिना प्रयोगशाळेच्या फॉरेन्सिक अहवालातून झाली असल्याचेही तपास पथकाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेआहे.
- घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले, परंतु 'कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह हालचाल यामध्ये आढळली नाही.
'आदित्य ठाकरेंना क्लीन चिट!
संजय राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणावर आज वक्तव्य केले. मुंबई पोलिसांच्या एसआयटी अहवालात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट देण्यात आल्याबद्दल शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, 'आता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे, देवेंद्र फडणवीस, इतर भाजप नेते, एकनाथ शिंदे, या सर्वांनी शिवसेना (यूबीटी) आणि आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, या सर्वांनी एका तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.'
काय आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात? (संक्षिप्त)
- पोस्टमार्टममध्ये हल्ल्याचे कोणतेही चिन्ह नाहीत
- कोणतेही संशयास्पद सीसीटीव्ही किंवा कॉल रेकॉर्ड नाहीत
- त्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींचे जबाब
- फॉरेन्सिक अहवालात ती खूप मद्यधुंद असल्याचे सिद्ध झाले
- एसआयटीविरुद्ध सीबीआय चौकशी आणि एफआयआर मागण्याची याचिका फेटाळण्याची मागणी पोलिसांनी केली.












Click it and Unblock the Notifications