दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्टची चर्चा; संशयास्पद नेमक काय होते रिपोर्टमध्ये? का सुरु आहे वाद? वाचा...
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. दिशाच्या वडिलांनी पाच वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आणल्याने या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय हे प्रकरण दाबण्यासाठी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रयत्न केल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कोर्टात याचिकाही दाखल केली. आता दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट पुन्हा चर्चेत आला आहे.

काय आहे रिपोर्टमध्ये?
दिशाचा मृत्यू नऊ जून २०२० ला झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच ११ जून २०२० ला तिचे पोर्टमार्टम करण्यात आले होते. दिशाचे पोस्टमॉर्टेम बोरिवली पोस्टमॉर्टेम सेंटरमध्ये झाले होते. अंतिम अहवालात दिशाचा मृत्यू डोक्याला दुखापत आणि काही अनैसर्गिक जखमांमुळे झाल्याचे उघड झाले होते. दिशाच्या मृत्यूचे मुख्य कारण इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडणे असू शकते, असेही डॉक्टरांचे म्हणणे होते. दिशाच्या हातावर, पायावर व छातीजवळ जखमा असल्याचा उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये होता.
पाच दिवसांनी सुशांतचा मृत्यू
दिशा सालियान ही अभिनेता सुशांत सिंग रजपूत याची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनीच सुशांत सिंग रजपूत याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही प्रकरणाची जास्त चर्चा झाली. कोणत्याही महिलेचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास, तिच्या गुप्तांगांची रासायनिक तपासणी केली जाते. या प्रकरणात ही रासायनिक अभिक्रिया झालेली नव्हती, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. दिशा सालियन हिच्या शवविच्छेदन अहवालात तिला अनेक अनैसर्गिक जखमा झाल्याचे म्हटले असल्याने आताही या पोस्टमार्टम रिपोर्टच्य चर्चा रंगल्या आहेत.
वडिलांचे गंभीर आरोप
दिशाचा मृत्यू ९ जून रोजी पहाटे २ वाजता झाला, परंतु तिचे पोस्टमॉर्टम घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजे ११ जून रोजी करण्यात आले. तिच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम करण्यास उशीर का झाला, यावरुनही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तिच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम बोरिवलीतील पोस्टमोर्टम सेंटरमध्ये करण्यात आले होते. दिशाच्या वडिलांनी आता या प्रकरणात अनेक आरोप केल्यामुळे चर्चा वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications