दिशा सालियान प्रकरणात का होतेय दिशा पटाणी, मिलिंद सोमनची चर्चा? पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट वेगळाच
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण गेल्या १५ दिवसांपासून जास्त चर्चेत आले आहे. आपल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून केल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला होता. आता मालवण पोलिसांनी तिच्या मृत्यूचा क्लोजर रिपोर्ट काय दिला होता, ही चर्चा सुरु झाली आहे.

काय होता क्लोजर रिपोर्ट?
मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे देण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यावेळी अभिनेत्री दिशा पाटणी व अभिनेता मिलींद सोमण या दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला होता. या दोन्ही जबाबात दिशा टेन्शनमध्ये होती, असे समोर आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सेलिब्रिटींमुळे दिशा टेन्शनमध्ये होती, असं पोलिसांचं म्हणणं होतं.
दिशा पटाणीमुळे सालियनला टेन्शन?
दिशा सालियान कॉर्नरस्टोन कंपनीत काम करत होती. त्यावेळी त्या कंपनीच्या जाहिरातीशी मिलिंद सोमण आणि दिशा पटणीचा यांचा संबंध आला होता. दिशा पटणी आणि मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद ठेवण्याची आणि बोलणी करण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटानीने नकार दिल्याने दिशा सालियन टेन्शनमध्ये होती. असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मिलिंद सोमणचा जबाब काय?
मिलिंद सोमणने काॅर्नरस्टोन कंपनीसोबत एका मोबाईल कंपनीची जाहिरात केली होती. या जाहिरातीचा करार संपल्यानंतर मिलींद सोमनने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. मिलिंद सोमणने #banchinaproducts हे ट्विट केल होते. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला. करार संपुष्ठात आल्याने मी केलेले ट्वीट डिलीट करणार नाही, अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा तणावात होती हेही एक कारण या क्लोजर रिपोर्टमध्ये सांगितलं होतं.
पोलिसांचा निष्कर्ष काय?
काॅर्नसस्टोन कंपनीसोबत दिशा सालियान काम करत होती. शिवाय दिशा पाटणी व मिलिंद सोमन यांच्यासोबतच तिचे काम होते. मात्र ही दोन्ही प्रकरणे एकामागून एक घडली व त्यामुळे दिशा सालियान टेन्शनमध्ये आली, असा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढला होता. वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.












Click it and Unblock the Notifications