दिशा पाटनीच्या घरावर हल्ला करणारे मारले; वडिलांनी मानले CM योगींचे आभार, म्हणाले-जसे म्हटले तसेच....
disha patani father thanks to yogi adityanath : उत्तर प्रदेशातील बरेली येथे अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर, अभिनेत्रीचे वडील आणि माजी डीएसपी जगदीश पटानी यांनी एक व्हिडिओ जारी करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार मानले आहेत.

नेमकी काय घडली होती घटना!
12 सप्टेंबर रोजी पहाटे 3:45 वाजता बरेली येथील दिशा पाटनीच्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अंदाजे नऊ गोळ्या झाडल्या होत्या.
या हल्ल्यानंतर, एका टोळीने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यामागे अभिनेत्रीची बहीण खुशबू पटानीने कथाकार प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्यावर केलेल्या टिप्पणीचा बदला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या घटनेनंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ जगदीश पटानी यांच्याशी फोनवर संपर्क साधून कुटुंबाला पूर्णपणे सुरक्षिततेचे आश्वासन दिले होते. या घटनेचा तपास करण्यासाठी नोएडा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त पथक तयार केले. पोलिसांनी २५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींची ओळख पटवून त्यांना चकमकीत ठार केले.
जगदीश पाटनी यांनी व्यक्त केली कृतज्ञता
आरोपींचा खात्मा झाल्यानंतर, जगदीश पाटणी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. ते म्हणाले, "मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो.
त्यांनी मला दिलेल्या वचनाप्रमाणे इतक्या कमी वेळात गुन्हेगारांना शोधून काढल्याबद्दल आणि इतकी कठोर कारवाई केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
ते पुढे म्हणाले- माननीय मुख्यमंत्र्यांशी फोनवर झालेल्या संभाषणात मी त्यांचे आभार मानले. त्यांच्या नेतृत्वाखाली, उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिस भयमुक्त समाजाचे स्वप्न पूर्णपणे साकार करत आहेत." या घटनेमुळे कुटुंब खूप घाबरले असल्याचे सांगत, जगदीश पाटनी यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे पाटणी कुटुंब आणि स्थानिक लोकांना दिलासा मिळाला आहे.












Click it and Unblock the Notifications