टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला गंभीर आजार; पतीने व्हिडिओद्वारे केला खुलासा; नेमकं काय झालंय
Dipika Kakar Latest News : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करबद्दल एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. दीपिका कक्करची तब्येत प्रचंड खालावल्याची माहिती समोर आली आहे.
दीपिकाचा पती, अभिनेता शोएब इब्राहिमने एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना पत्नीच्या आजाराविषयी माहिती दिली. टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही वर्षांपासून आता टीव्हीवर दिसत नाही. पण ती व्लॉग्सद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. दीपिका आणि शोएब दोघेही व्हीलॉग करतात आणि चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल अपडेट देत राहतात.
अशातच, आता शोएबने दीपीकाविषयी एक खुलासा केला आहे. ज्यामुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले आहेत. ते आता दीपिकासाठी प्रार्थनाही करू लागले आहेत. शोएबने त्याच्या पोस्टमध्ये खुलासा केला आहे की दीपिकाला एक गंभीर आजार झाला आहे. ज्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक झाली आहे.

दीपिकाच्या यकृतात ट्यूमर!
शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले आहे की, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागामध्ये ट्यूमर आहे. ही गाठ आकाराने बरीच मोठी आहे. यावेळी शोएबचा चेहरा खूपच उदास दिसत होता.
शोएब म्हणाला- दीपिकाची तब्येत ठीक नाहीये, तिला पोटाचा काही त्रास आहे जो खूप गंभीर आहे. खरंतर मी चंदीगडला होतो आणि दीपिका मुंबईत होती आणि तिला पोटदुखी होत होती. दीपिकाला वाटले की ही एक सामान्य वेदना आहे. पण जेव्हा ती वाढली तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. काही रक्त चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तिच्या पोटात संसर्ग झाल्यास उघडकीस आले.
शोएबच्या चेहऱ्यावर पत्नीबद्दलची दिसली चिंता
शोएब म्हणाला- आमच्या डॉक्टरांनी आम्हाला फोन केला आणि सांगितले की आम्हाला सीटी स्कॅन करावे लागेल. यानंतर, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागामध्ये ट्यूमर असल्याचा अहवाल आला. ट्यूमरचा आकार टेनिस बॉलसारखा आहे. हे आम्हा सर्वांसाठी खूप धक्कादायक आहे. आम्हाला सर्वांना फक्त काळजी होती की कर्करोग होऊ शकतो. तथापि, आतापर्यंत अहवालात असे काहीही आलेले नाही. दीपिकाच्या अजून काही चाचण्या करायच्या आहेत, असेही शोहबने सांगितले.












Click it and Unblock the Notifications