Dhurandhar Movie 'धुरंधर'चा धमाका! रणवीर सिंहच्या मुव्हीचा पहिला रिव्ह्यू आला; कसा आहे सिनेमा? वाचा
Dhurandhar Movie Review in marathi : बॉलिवूडमधील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' या चित्रपटाचा पहिला अधिकृत रिव्ह्यू समोर आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची भव्यता (स्केल), धारदार ॲक्शन आणि तगडी स्टारकास्ट यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चा आहे. रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारखे शक्तिशाली कलाकार एकत्र आल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

समीक्षकाने म्हटले 'आऊट ऑफ सिलॅबस' चित्रपट
वनइंडियाच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी 'धुरंधर' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले रिव्ह्यू शेअर केले आहेत. त्यांच्या मते, हा चित्रपट 'आऊट ऑफ सिलॅबस' आहे.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा
संधू यांच्या मते, चित्रपटाची लांबी तीन तासांहून अधिक असूनही, यात एकही क्षण असा नाही जिथे प्रेक्षकांची उत्सुकता कमी होईल. चित्रपटाची कथा (स्क्रीनप्ले) प्रेक्षकांना सतत पकडून ठेवते आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सीटला खिळवून ठेवते उमैर संधू यांच्या मते, 'धुरंधर' हा एक 'पॉवर-पॅक्ड' सिनेमॅटिक अनुभव आहे, जो अजिबात चुकवू नये.
रणवीर सिंहची सर्वात दमदार भूमिका
समीक्षकाच्या मते, 'धुरंधर' ही रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वात दमदार परफॉर्मन्स पैकी एक आहे. रणवीर संपूर्ण चित्रपटात एका वेगळ्याच ऊर्जेने (Energy) दिसतो आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रभावित करतो.
सहाय्यक कलाकारांचा प्रभाव: संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांसारख्या सहाय्यक कलाकारांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले आहे. या दोघांची उपस्थिती चित्रपटाची कथा अधिक मजबूत करते आणि त्यांची कामगिरी अनेक ठिकाणी प्रेक्षकांना सरप्राईज देते.
भव्य ॲक्शन आणि जबरदस्त डायलॉग्स
संधू यांच्या रिव्ह्यूनुसार, 'धुरंधर'चे प्रोडक्शन डिझाईन अत्यंत शानदार आहे, जे चित्रपटाला भव्यता प्रदान करते. ॲक्शन सीक्वेन्सेस, दमदार डायलॉग्स (संवाद) आणि उत्तम पटकथा या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव देतात. चित्रपटाचा उत्तरार्ध आणि शेवटची २० मिनिटे इतकी प्रभावी आहेत की, प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडतानाही कथेच्या प्रभावाखाली राहतात.
उमैर संधू यांनी 'धुरंधर'ला 'मस्ट वॉच' असे सांगून, बॉलिवूड पुन्हा एकदा 'पटरीवर' परतल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा सल्ला दिला आहे.












Click it and Unblock the Notifications