Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Dharmendra's Last Rites : धर्मेद्र यांच्या अंत्यसंस्कारात ईशा देओलच दिसली, इतर 3 मुली का आल्या नाही?

Dharmendra's Last Rites Why Were Ajita Vijeta and Ahana Deol Absent : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांनी धर्मेद्र यांच्या निधनाचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही, मात्र ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. मात्र, सर्वांत जास्त चर्चा झाली ती धर्मेद्र यांच्या चार मुलींच्या गैरहजरीची.

त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल स्मशानभूमीत उपस्थित होत्या, पण त्यांच्या इतर तीन मुली, अजिता, विजेता आणि अहना देओल मात्र अंतिम संस्काराला दिसल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Dharmendra s Last Rites

अंत्यसंस्काराला फक्त ईशा देओल का?

धर्मेद्र यांना पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याकडून दोन मुली (अजिता आणि विजेता) आणि दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांच्याकडून दोन मुली (ईशा आणि आहना) आहेत. ईशा देओल वडिलांच्या खूप जवळ होती आणि ती सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो नेहमी शेअर करत असे. त्यामुळे अशा दुःखद प्रसंगी तिची उपस्थिती नैसर्गिक होती. ती आई हेमा मालिनी यांच्यासोबत स्मशानभूमीतून बाहेर पडताना दिसली. धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुलाखतीत असेही म्हटले होते की त्यांना त्यांच्या सर्व मुलांवर प्रेम आहे.

सर्व मुली खंबीरपणे कुटुंबासोबत उभ्या

सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या इतर तीन मुली देखील सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबईत आहेत. अंत्यसंस्कारानंतर होणाऱ्या विधींमध्ये त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत आहे. असे सांगितले जात आहे की तिन्ही मुली धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यानंतर अमेरिकेहून मुंबईत आल्या आहेत आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासोबत सतत खंबीरपणे उभ्या आहेत.

अजिता आणि विजेता देओल अनुपस्थित?

धर्मेद्र यांच्या पहिल्या पत्नीच्या या दोन्ही मुली नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या आहेत. त्या दोघीही अमेरिकेत स्थायिक आहेत आणि त्यांचा चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघीही सध्या मुंबईतच आहेत, पण विदेशात स्थायिक असल्याने काही धार्मिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्या अंत्यसंस्काराला आल्या नाहीत, अशी चर्चा आहे.

अहना देओलची अनुपस्थिती?

हेमा मालिनी यांची छोटी मुलगी आहना देओल सार्वजनिक कार्यक्रमात फार कमी दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेद्र यांच्या इतर तीन मुली, म्हणजेच अहना, अजिता आणि विजेता, या तिघीही प्रकृती बिघडल्यामुळे अमेरिकेतून मुंबईला आलेल्या आहेत आणि सध्या कुटुंबासोबतच आहेत. अंतिम संस्कारानंतर होणाऱ्या विधींमध्ये त्या नक्कीच सहभागी असतील, असे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+