Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'हा' दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचा 'छोटा भाऊ!' नाव ऐकूण व्हाल थक्क! भावाबद्दल बोलले होते भरभरुन..

Dharmendra News : 'शोले' चित्रपटातील 'जय' (अमिताभ बच्चन) आणि 'विरू' (धर्मेंद्र) यांची ऑनस्क्रीन मैत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे, तर दुसरीकडे खुद्द 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे ऑफस्क्रीनही हे नाते किती घट्ट आहे हे दाखवून दिलेले आहे. आपल्या प्रकृतीमुळे सध्या सर्वांचे लक्ष लागलेल्या धर्मेंद्र यांनी आपल्या छोट्या भावाबद्दल जाहीररित्या एकदा सांगितले होते. तो छोटा भावाचे नाव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल..!

Dharmendra News

कोण आहे तो छोटा भाऊ?

व्यासपीठावरच अमिताभ बच्चन यांना धर्मेंद्र यांनी प्रेमाने "माझा छोटा भाऊ" (My Younger Brother) म्हणून संबोधले होते. या भावनिक व्हिडिओमुळे त्यांच्यातील केवळ व्यावसायिक नव्हे, तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा उघड झाले आहे.

अमिताभ बच्चन माझा 'छोटा भाई'

धर्मेद्रजींचा हा व्हिडिओ अशा वेळी व्हायरल होत आहे, जेव्हा त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती आणि रुग्णालयातून त्यांचा एक खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळे गदारोळ झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांचे कौतुक करताना दिसतात.

काय म्हणाले होते तेव्हा धर्मेंद्र?

"मी अमिताभला माझा 'छोटा भाई' (धाकटा भाऊ) मानतो आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो." अभिनेते धर्मेंद्र बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मेहनतीची आणि सातत्याने कार्यरत राहण्याच्या ऊर्जेची प्रशंसा करतात. संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांच्या ऊर्जेतून प्रेरणा घेते, असेही ते म्हणाले. याच कार्यक्रमात त्यांनी जया बच्चन यांना प्रेमाने "गुड्डी" म्हणून संबोधले आणि जया यांनी त्यांच्या चित्रपटांप्रति व्यक्त केलेले प्रेम व ऑटोग्राफ देण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.

गोपनीयता भंगाचा वाद आणि अमिताभ यांची नाराजी

धर्मेद्र यांना रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या आयसीयू मधील त्यांच्या मुलांसोबतचा (सनी देओल आणि बॉबी देओल) व्हिडिओ लीक झाला होता. या घटनेने नैतिकता आणि गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. अमिताभ बच्चन यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करत, कोणत्याही घटनेचा उल्लेख न करता, अशा वर्तणुकीला "नो एथिक्स" असे कठोर शब्द वापरून टीका केली.

आपल्या ब्लॉगमध्ये बिग बी यांनी लिहिले की, काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी संवेदनशील क्षणांचा गैरवापर करत आहेत, जे अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे.

धर्मेंद्र यांच्या तब्येत कशी आहे?

धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला असून, ते घरी विश्रांती घेत आहेत. दरम्यान, त्यांच्या निधनाची खोटी अफवा पसरली होती, जी हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी स्पष्टपणे नाकारली आणि ते हळूहळू बरे होत असल्याचे सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+