Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'गैरों के बिस्तर पे अपनों का सोना देखा...' चहलच्या टी-शर्टनंतर आता धनश्रीच्या 'त्या' गाण्याची चर्चा

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर पत्नी धनश्री वर्मा हे आज वेगळे झाले. गुरुवारी मुंबई कुटुंब न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, चहलला धनश्रीला पोटगी स्वरुपात ४.७५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. आता याच चर्चा दरम्यान, धनश्रीचा नवा व्हिडीओ अल्बम प्रसिद्ध झाला आहे. त्या अल्बमचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.

Chahal-Dhanashree divorce

धनश्रीचा नवीन व्हिडिओ

युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाची आणि त्याच्या टी-शर्टवर लिहिलेल्या शब्दांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच, धनश्रीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच धनश्रीने तिच्या चाहत्यांना ही मोठी व आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियाद्वारे तीने आपल्या गाण्याची व अल्बमची माहिती दिली.

धनश्रीचे नवीन गाणे रिलीज

धनश्री वर्मा ही टी-सीरीजसोबत एक व्हिडिओ अल्बम बनवत आहे. त्या अल्बमचे पहिले गाणे गुरुवारी रिलीज झाले. मनोरंजक गोष्ट म्हणजे या गाण्याचे बोल खूप वेदनादायक आहेत. योगायोग म्हणजे तिच्या अल्बमचे गाणे आणि घटस्फोट हे दोन्हीही आजच झाले. धनश्री वर्मा आणि अभिनेता इश्वाक सिंग यांचे हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचे बोल आहेत, और क्या देखूं मैं, अब कुछ तो बाकी नहीं, गैरों के बिस्तर पे अपनों का सोना देखा, देखा जी देखा मैंने दिल का रोना देखा।

चाहते भावनिक झाले

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीच्या नवीन गाण्याने चाहत्यांना भावनिक केले. सोशल मीडियावर चाहते हे गाणे पसंत करत आहेत पण त्याचबरोबर ते धनश्रीला या कठीण काळात धीर आणि धाडस दाखवण्याचा सल्लाही देत ​​आहेत.

चार वर्षांचा संसार मोडला

टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने २०२० मध्ये धनश्रीसोबत विवाह केला होता. कोरोना काळात दोघांचीही प्रेमकहाणी सोशल मीडियावर ट्रेंड करत होती. ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या. अखेर चहल आणि धनश्रीचा घटस्फोट झाला. युजवेंद्र चहलचा टी-शर्ट आज सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिला. 'बी युअर ओन शुगर डॅडी' म्हणजे स्वतःचे आर्थिक पाठबळ बना, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. सोशल मीडियावरील चाहते याला धनश्री वर्माची टोमणा म्हणून पाहत आहेत. तोच आज धनश्रीचे गाणेही चर्चेत आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+