Deepika Padukone : दीपिका पादुकोण रिलायन्स रुग्णालयात दाखल, लवकरच गुड न्यूज देणार?
Deepika Padukone Hospitalised : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणतिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिकाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी दिली तेव्हाच ती सप्टेंबर महिन्यात त्यांच्या बाळाचं स्वागत करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आज मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ती दाखल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
दीपिका पदुकोणला एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ती कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. रिलायन्स रुग्णालयात जाताना दीपिकाची गाडी दिसली. त्यावेळी तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील अन्य लोक देखील गाडीत दिसून आले. दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर व दिपीकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका आणि रणवीर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेतच. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दीपिका सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बाळाला जन्म देणार अशी चर्चा रंगलेली आहे.पण त्या आधीच अभिनेत्री चाहत्यांना गोड बातमी देण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये दीपिका गणेश चतुर्थीच्या दिवशी गोंडस बाळाला जन्म देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रणवीरने देखील खास बायकोसाठी शेड्यूल्डमधून ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपल्या बायकोची काळजी घेताना दिसत आहे. लग्नाच्या 6 वर्षानंतर दीपिका- रणवीर गोड बातमी देणार आहेत.
दीपिका शेवटची कल्की चित्रपटात दिसली
दीपिका शेवटची 'कल्की 2898 एडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर रणवीर 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता लवकरच अभिनेता 'डॉन ३' आणि 'सिंघम अगेन' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. 'गोलियों की रासलीला: रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'गोलियों की रासलीला: रामलीला', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', '83' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.












Click it and Unblock the Notifications