'या' दोन गंभीर आजारांशी झुंज देतेय दीपिका पदुकोण;दोन चित्रपटांतून बाहेरचा रस्ता, नेमकं झालयं काय?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या तिच्या नावाशी संबंधित आरोग्यविषयक आणि करिअरविषयक महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' या चित्रपटातून दीपिकाला वगळण्यात आलं आहे. तिच्या जागी तृप्ती डिमरी हिची वर्णी लागल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, दीपिकाला 'कल्कि 2' मधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या निर्णयामागे कारण म्हणून तिच्या जास्त फीची मागणी व शूटिंगसाठी मर्यादित वेळ (7-8 तासांची अट) या गोष्टी नमूद केल्या जात आहेत. मेकर्सना तिच्या अटी मान्य नसल्यामुळे तिला दोन मोठ्या प्रोजेक्टमधून वगळण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
आई झाल्यानंतर कामापासून ब्रेक
2024 मध्ये दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्मापूर्वीच तिने कामातून ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा कामावर परतण्याचा विचार करत होती, मात्र अलीकडील घडामोडींमुळे तिची ही योजना अनिश्चित झाली आहे.
दीपिका दोन गंभीर आजारांशी लढतेय
दीपिका पदुकोणने स्वतःच्या आरोग्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ती ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) आणि हार्ट अरिदमिया (Heart Arrhythmia) या दोन गंभीर आजारांशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही ती डिप्रेशनमुळे त्रस्त होती. रणबीर कपूर याच्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती व काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली होती.
OCD म्हणजे नेमकं काय?
OCD हा एक मानसिक आरोग्याशी संबंधित त्रास आहे, ज्यामध्ये व्यक्ती एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहतो. दीपिका आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये खूपच नीटनेटकेपणा दाखवते, जी तिच्या OCD ची झलक आहे. एका पोस्टमध्ये तिने आपली अलमारी व्यवस्थित हँगरमध्ये लावलेली दाखवली होती. रिपोर्ट्सनुसार ती कधी कधी मित्रांच्या घरी गेल्यावरसुद्धा वस्तू नीट लावते.
एका मुलाखतीत दीपिकाने सांगितलं की, "खूप लोकांसाठी ही गोष्ट चिंतेची वाटू शकते, पण मला माझा OCD त्रास देत नाही." मात्र अनेक तज्ज्ञांच्या मते, हाच नीटनेटकेपणाचा अतिरेक व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात अडथळा निर्माण करू शकतो. या विकारामुळे व्यक्ती सतत एखादी गोष्ट तपासत राहतो - जसे की ताले लावलेत का, खिडक्या बंद आहेत का, वस्तू योग्य ठिकाणी आहेत का इत्यादी.
हार्ट अरिदमिया - हृदयाच्या ठोक्यांचा अनियमितपणा
दीपिकाला दुसरा आजार म्हणजे हार्ट अरिदमिया आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला अचानक हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितपणा जाणवला. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेऊन ती ठीक झाली, आणि पुन्हा कामावर परतली.
दीपिकाचा हा अनुभव स्पष्ट दाखवतो की, मानसिक व शारीरिक आरोग्य एकमेकांशी किती घट्ट जोडलेले असते. एकीकडे तिचं करिअर मोठ्या चित्रपटांमधून मागे राहत असतानाच दुसरीकडे तिचा आरोग्यप्रश्न अधिक गांभीर्याने पुढे येत आहे.












Click it and Unblock the Notifications