मोठी बातमी..! अल्लू अर्जुन अटक प्रकरणात आता यू-टर्न; मृताचा पती म्हणतो, मी तक्रार...

Allu Arjun Arrested- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अल्लू अर्जुनने आज जामीनासाठीही अर्ज दाखल केला. आज दिवसभर याच विषयाच्या बातम्यांनी भारतातील प्रसारमाध्यमांवर चर्चा झाली. दरम्यान, सायंकाळी उशीरा या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. मृत महिलेच्या पतीने अल्लू अर्जुनला अटक झाली असेल तर, मी माझी तक्रार मागे घेण्यास तयार आहे, असे सांगितल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Allu Arjun

काय म्हणाले मृताचे पती

ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्कर याने माध्यमांशी बोलताना आज त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, त्यांना अल्लू अर्जुनच्या अटकेची माहिती नाही. जर या अभिनेत्याच्या अटक झाली असेल तर, त्यांच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास ते तयार आहेत. भास्करने म्हणाले, "अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही."

अल्लू अर्जुननेही मागितली माफी

अल्लू अर्जुनला एक संवेदनशिल अभिनेता म्हणून ओळखले जाते. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जुनने या दुर्घटनेबद्दल लगेचच दिलगिरी व्यक्त केली होती. एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने म्हटले, "संध्या थिएटरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच या कठीण काळात मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी स्वतःला एकाकी समजू नये, मी स्वतः त्यांची भेट घेईल. पुढील खडतर वाटचालीसाठी जी मदत लागेल, ती मी करेन."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+