Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनसे थोबाड फोडणार, शिवसेना फटकावणार; मुनावर फारुकीवर सगळेच तापले! त्यानं नेमकं असं केलं काय? वाचा

स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीने पुन्हा एक वाद ओढावून घेतला आहे. एका कार्यक्रमादरम्यान कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आता त्याच्यावर अनेक राजकीय पक्षांनी तोंडसुख घेतले. मनसेने त्याला फटकविण्याची धमकी दिली, तर शिंदे गटाच्या एका नेत्यानेही त्याला फटकविणाऱ्याला एक लाखांचे बक्षिस जाहीर केलं आहे.

भाजपच्या नेत्यानेही आता मुनावर फारुकीला पाकीस्तानात पाठविण्याची धमकी दिल्याने वातावरण चिघळलं आहे. Big Boss 18 चा विजेता असणाऱ्या मुनावर फारुकीने या सगळ्या प्रकारानंतर जाहिर माफी मागितली. मात्र हा वाद कधी थांबेल का हा प्रश्न आहे.

Nitesh Rane s threat to send Munawar Farooqui to Pakistan Latest Marathi News

मुनावरने नेमकं काय केलं होतं?

मुनावर फारुकी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. गेल्या आठवड्यात त्याने एक शो केला होता. त्यामध्ये त्याने कोकणी माणसांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. हे कोकणी लोक * बनवतात.) अशी अश्लील टीका त्याने केली होती. यानंतर वादाचे मोहळ उठले. अशा शब्दाचा वापर केल्याने कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला. कोकणी माणसावर असं बोलण्याचा अधिकार मुनावरला कुणी दिला, असं म्हणत त्यानंतर वातावरण पेटलं होतं. एका शब्दामुळे मुनावरविरोधात वातावरण तयार झालं.

शिंदे गटाच्या नेत्याचं एक लाखांचं बक्षिस

हा वाद वाढल्यानंतर मराठी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते, आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा समाधान सरवणकर यांचा मुलाने मुनव्वरला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर केलं. पाकिस्तानप्रेमी मुनव्वरने कोकणी लोकांची माफी मागितली नाही, तर जिथे दिसेल तिथे त्याला बदडणाऱ्यांना एक लाख रुपये देण्यात येतील, असे सरवणकर यांनी जाहीर केले. मनसेने मुनावर जिथे दिसेल, तिथे फटकवण्याचे जाहीर केले.

नितेश राणेंनी दिली पाकीस्तानात पाठविण्याची धमकी

या प्रकरणात भाजपनेही उडी घेतली. भाजप नेते नितीश राणे यांनी मुनावरची चांगलीच कान उघडणी केली. तुझ्यासारखे हिरवे साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. तू कोकणातील जनतेला शिव्या दिल्या आहेस. माफी न मागितल्यास तुला पाकिस्तानला पाठवण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली.

मुनव्वर फारुकी याने मागितली माफी

सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्याने मुनव्वर फारुकी याने त्याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली. माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला. कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचे बोललो असे काहींना वाटते. त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोकणावर माझे खूप खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतो, असे फारुकीने स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+