कॉमेडियन कबीर सिंगचे निधन, वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं नेमकं कारण काय?
kabir kabeezy Singh Death : मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'अमेरिका गॉट टॅलेंट'च्या उपांत्य फेरीत पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन आणि स्पर्धक कबीर कबीरजी सिंग यांचे आकस्मिक निधन झाले आहे. वयाच्या 39 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.
कॉमेडियन कबीर सिंगचा मृतदेह घरात आढळला
काही माध्यमांच्या अहवालानुसार, अभिनेता आणि कॉमेडियन कबीर सिंगचा मृतदेह त्याच्या कॅलिफोर्नियातील घरी सापडला आहे. कॉमेडियनच्या आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, कॉमेडियनचा झोपेतच मृत्यू झाल्याचे कबीरच्या एका मित्राने सांगितले.

कबीराचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असे मानले जाते. सध्या कबीरचे कुटुंबीय आणि पोलीस टॉक्सिकॉलॉजीच्या अहवालाची वाट पाहत आहेत.
कबीर सिंगच्या पत्नीने दिली मृत्यूची माहिती
कबीर यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, तो काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होता. पीपलच्या वृत्तानुसार, कबीर सिंगच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबद्दल सांगितले. कबीरचा मृत्यू 4 डिसेंबर 2024 रोजी झाला.
कोण होता कॉमेडियन कबीर सिंग?
- पोर्टलँडमध्ये भारतीय पालकांच्या पोटी जन्मलेल्या कबीर सिंग यांना लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती. वयाच्या 9व्या वर्षापासून ते स्टेजवर परफॉर्म करायचे. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय मुंबईला परतले.
- कबीरला अनेकदा अमेरिकन मूल म्हणून छेडले जायचे आणि त्यामुळे त्याने संवाद साधण्यासाठी तीन वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवले.
- वयाच्या 13 व्या वर्षी कबीर परत अमेरिकेला गेला. भारतीय-अमेरिकन असल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तो त्याच्या कॉमेडीसाठी चर्चेत असतो.
- 'फॅमिली काऊ' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉमेडियनला 2021 साली 'अमेरिकाज गॉट टॅलेंट'मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्यांनी भारताला गौरव मिळवून देत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
- कबीर या शोमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या कामाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. परंतु, त्या शोमध्ये जादूगार डस्टिन टवेला अमेरिकेच्या गॉट टॅलेंटच्या सीझन 16 मध्ये विजेता ठरला.












Click it and Unblock the Notifications