अभिनेत्री अनन्या पांडेचा बर्थ-डे; 6 जणांशी लव्हस्टोरी, शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज पुरवले, वाचा किस्से
Ananya Pandey @26 Birthday : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी तसेच आता युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री अनन्या पांडे ही आज 26 वर्षांची झाली आहे. 2019 मध्ये तीने चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे. गत पाच वर्षांमध्ये तीने एकूण 10 चित्रपटासह वेबसिरीजमध्ये काम केले आहे. स्टुडंट ऑफ द इयर-2 चित्रपटाने तिची सिनेसृष्टीत चांगली ओळख बनवली. मात्र, ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सोशल मीडयावरील ट्रोलिंगमुळे अधिक चर्चेत असते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी सविस्तर.
हिरोईन होण्यासाठी शिक्षण सोडले
30 ऑक्टोबर 1998 रोजी अनन्याचा जन्म झाला. तिचे वडील प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे हे असून तिची आई भावना पांडे या कॉस्च्युम डिझायनर आहेत. कुटुंबात अनन्याला एक धाकटी बहीण रईसा देखील आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे ती अनन्याला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. तिने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांतर अभिनय करण्यासाठी तिने शिक्षणातून काही काळ ब्रेक घेतला.

या चित्रपटातून केले करिअर पदार्पण
अनन्या पांडे हिने 2019 साली तिच्या करिअरला सुरूवात केली. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाची अनन्या ही डाय-हार्ड फॅन आहे. हा चित्रपट पाहून ती वरुण धवनची फॅन झाली. काही वर्षांनंतर, जेव्हा करण जोहरने तिला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटाचा दुसरा भाग ऑफर केला तेव्हा अभिनेत्रीने ती ऑफर लगेच स्वीकारली. अनन्यापूर्वी करणने 'SOTY 2'साठी सारा अली खान आणि जान्हवी कपूरसह अनेक अभिनेत्रींच्या नावावर विचार केला होता. पण यात अनन्याला संधी मिळाली.

दीपीकासोबत संधी मिळताच प्रचंड खूश झाली
अनन्या पांडे हीला प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.अनन्या पांडेने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला अनेक दिवसांपासून दिग्दर्शक शकुन बत्रा आणि दीपिका पदुकोणसोबत काम करायचे होते. एके दिवशी शकुनने स्वतः तिला फोन करून 'गहराईं' चित्रपटाची ऑफर दिली. तेव्हा अनन्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर तिला इतका धक्का बसला की तिने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले.

अनन्या प्रचंड फूडी
अनन्या नंबर वन फूडी आहे. बटर चिकन आणि चीज नान हे तिचे आवडते पदार्थ आहेत. याशिवाय तिला तिचे जेवण कधीच शेअर करायला आवडत नाही. याच्याशी संबंधित एक रंजक किस्सा 'गहराईं' चित्रपटातील अनन्याची सहअभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सांगितला. तिने सांगितले की, एकदा आम्ही सर्वांनी अनन्याला अचानक भेट दिली, तेव्हा ती कीमा पाव खात होती. तिने आम्हा सर्वांसाठी स्वतंत्रपणे जेवणाची ऑर्डर दिली, पण तिचा पाव कोणाशीही शेअर केला नाही.
अनन्यावर ड्रग्ज पुरवल्याचा आरोप
2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) पर्यंत पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीला आर्यनच्या फोनमध्ये अनन्या पांडेसोबतची जुनी चॅट सापडली, ज्यामध्ये दोघेही ड्रग्जबद्दल बोलत होते. अशीही चर्चा होती की, आर्यनने आपल्या वक्तव्यात अनन्यानेच आपल्याला ड्रग्ज पुरवल्याचं म्हटलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने त्यानंतर एक विधान केले होते की 2019 मध्ये अनन्याला तिची धाकटी बहीण वीड (ड्रग्ज) घेताना दिसली आणि हे तिच्या पालकांपासून लपवत असताना तिने ते वीड आर्यनला विल्हेवाट लावण्यासाठी दिले होते. मात्र, एनसीबीच्या चौकशीदरम्यान अनन्याने हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की, तिची आणि आर्यनची लहानपणापासूनची मैत्री आहे आणि तो तिला या प्रकरणात का ओढत आहे हे तिला माहीत नाही. तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
सहा जणांशी प्रेमप्रकरण..!
पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर अनन्याचे नाव आतापर्यंत 6 लोकांशी जोडले गेले आहे. परंतु,याबाबत अभिनेत्रीने स्वत:हून कधीही पुष्टी दिलेली नाही. यामध्ये प्रामुख्याने करण जयसिंग, कार्तिक आर्यन, इशान खट्टर, विजय देवरकोंडा, आदित्य रॉय कपूर आणि वॉकर ब्लँको यांच्या नावाचा समावेश आहे. या सहा जणांना अनन्याने डेट केले होते, अशी चर्चा काही मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आली होती. यात विशेष करुन कार्तिक आर्यन याची देखील चर्चा होती. 2019 मध्ये, बातमी आली की अभिनेत्री 'पति, पत्नी और वो' चित्रपटातील सहकलाकार कार्तिक आर्यनला डेट करत आहे. तर 2022 मध्ये, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अनन्या 'लायगर' चित्रपटातील सहकलाकार आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता अनन्या मॉडेल वॉकर ब्लँकोला डेट करत आहे. दोघेही या वर्षी जूनमध्ये अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात भेटले होते, त्यामुळे त्यांची प्रेम कहाणीची चर्चा रंगली.
अनन्याच्या बेस्ट फ्रेंड कोण, कोणासोबत आहेत वाद
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि अनन्या एकाच शाळेत शिकत असल्याचं फार कमी लोकांना माहिती आहे. अलीकडेच मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत अनन्या म्हणाली, एकाच शाळेत शिकत असूनही मी साराची मैत्रीण नव्हते. मला तिची भीती वाटत होती. ती खूप स्पष्टवक्ती होती आणि कोणाच्याही समोर काहीही बोलायची. तिला शाळेत बघून मी रस्ता बदलत असे. पण आता सारा आणि अनन्या चांगल्या मैत्रीणी आहेत. दुसरे म्हणजे अनन्याची शाळेतील अन्य दोन खास मैत्रिणी आहेत. यामध्ये संजय कपूरची मुलगी शनाया आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना या अनन्याच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. तिघीही लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत आणि दररोज त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर करत असतात.












Click it and Unblock the Notifications