चिरंजीवी 1650 कोटीच्या संपत्तीचे मालक, खाजगी विमान, आलिशान जीवन, असे बनले सर्वात श्रीमंत अभिनेता
Chiranjeevi Birthday: साउथ सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर काम करत असून लोकांची मने जिंकत आहेत. लोक त्यांना प्रेमाने मेगा स्टार म्हणतात. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच चिरंजीवी हे एक उत्कृष्ट राजकारणी देखील आहेत.
चिरंजीवी यांचा 69 वा वाढदिवस
चिरंजीवी केवळ अभिनयासाठीच नाही तर सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहेत. चिरंजीवीची लोकप्रियता त्याच्या डायलॉग डिलिव्हरीमुळे आहे. आज चिरंजीवी त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला अभिनेत्याची एकूण संपत्ती आणि कमाईबद्दल सांगणार आहोत.

-चिरंजीवीने तेलुगू इंडस्ट्रीत स्वत:च्या बळावर स्वत:चं खास स्थान निर्माण केलं आहे. चिरंजीवी यांचे वडील कोनिडेल वेकांता राव हे व्यवसायाने हवालदार होते, तरीही त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.
- आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात 1955 मध्ये जन्मलेल्या चिरंजीवीचे खरे नाव कोनिडेला शिव शंकर वरप्रसाद राव आहे. या अभिनेत्याला सुरुवातीला क्रिकेटर व्हायचे होते, पण अंगठ्याला इतकी दुखापत झाली की, यांना क्रिकेटपासून दूर राहावे लागले. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
-1978 मध्ये चिरंजीवीने 'प्रणाम खारू' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1983 मध्ये आलेल्या 'कैदी' चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
- चिरंजीवीला 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'आपदबंधवुडू' या चित्रपटासाठी 1.25 कोटी रुपये मानधन मिळाले होते. यानंतर तो तेलुगू सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार बनला आणि फीच्या बाबतीत बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले.
चिरंजीवी 1650 कोटींचा मालक
-साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. मेहनत करून त्यांनी हे स्थान मिळवले आहे. 45 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक मानलं जातं.
-जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, चिरंजीवीची एकूण संपत्ती 1650 कोटी रुपये आहे. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच ते व्यवसाय, जाहिरात आणि गुंतवणुकीतून भरपूर कमाई करतात. त्यांच्याकडे खासगी विमानही आहे.












Click it and Unblock the Notifications