भावा.. 'छावा' एवढा खास का? रश्मिकाचा लूक अन् पेहरावाची चर्चा, 'या' तारखेला होणार चित्रपट रिलीज

Chhawa Movie Release Date : बहुप्रतिक्षित छावा चित्रपटाची हल्ली सर्वत्र चर्चाच चर्चा आहे. छावा हा अलीकडच्या काळातील प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारा चित्रपट ठरु पाहतोय. छावा या चित्रपटाची गेल्या कित्तेक दिवसांपासून केवळ रसिकांतच नाही तर बाॅलीवूडमध्येही चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतं आहेत.

विकी कौशलची भूमिका आणि त्यात सोबतीला रश्मिका मंदाना या दोघांची क्रेझ तरुणांमध्ये बरीच आहे. पुष्पा 2 मध्ये अभिनयाच्या कसोटीवर खरी उतरलेली रश्मिका छावा चित्रपटात येसूबाईच्या भुमिकेत आहे. तिचा पेहराव आणि लूक अगदी भावणारा आहे. हे अलीकडेच, चित्रपटातील स्टार कास्टचे पोस्टर्स निर्मात्यांनी शेअर केल्यानंतर दिसून आले आहे. या पोस्टर्सनेच सिनेप्रेमींच्या हृदयावर कब्जा केला. आता तर 'छावा' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही रिलीज झाला आहे, जो चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करणारा आहे.

Chhawa Movie Release Date

छावाचा हा धमाकेदार ट्रेलर अक्षरशा तुम्हाला थक्क करेल... त्यामुळे तुमची या चित्रपटबद्दलची उत्सुकताही आणखीनच वाढेल. आता एक नजर टाकूया छावा चित्रपटाच्या ट्रेलरवर

'छावा'चा ट्रेलर रिलीज

काही दिवसांपूर्वीच 'छावा'चा ट्रेलर रिलीज झाल्याची घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली होती. अशा परिस्थितीत ठरल्यानुसार 22 जानेवारीला चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मॅडॉक फिल्म्सने ते आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तो लॉन्च केले आहे.

रश्मिकाच्या लुक्सची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की विकी कौशल शूर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खूपच डॅशिंग दिसत आहे. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसते. याशिवाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या सिनेमात, मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना याने साकारली आहे आणि अक्षय हा खलनायकाच्या भूमिकेत आहे.... त्याचा लुकच्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे....

छावामधील रश्मिका मंदानाचा नववारी साडीतला मराठमोळा लूकमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झालाय... आता त्यांचा दमदार अभिनयाची झलक हि छावाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. एकूणच, हा 3 मिनिट 8 सेकंदाचा ट्रेलर तुम्हाला खिळवून ठेवतो... आणि संभाजी महाराजांचे पात्रांने म्हणजेच विकी कौशलने साकारलेली भुमिका तुम्हाला तुमचे डोळे हटवू देणार नाही असं दिसतं.. छावाचे निर्माते दिनेश विजन आणि अमर कौशिक आहेत, ज्यांनी यापूर्वी गेल्या वर्षी स्त्री 2 सारखे मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते...

छावा कधी प्रदर्शित होणार?

विकी कौशलचा छावा हा चित्रपट गेल्या वर्षी सहा डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सोबत बॉक्स ऑफिसची कमाई पाहता छावाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वजण या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+