Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'छावा' चित्रपटातील या अभिनेत्याच्या घरी येणार चिमुकला; चाहत्यांना गुड न्यूज, शेअर केले खास Photos

Chhawa fame actor Vineet Kumar Singh is going to be a father soon : 'छावा' फेम अभिनेता विनीत कुमार सिंहच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं लवकरच आगमन होणार आहे. सोशल मीडियावर खास खास फोटो शेअर करत त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. विनीतची पत्नी रुचिरा गरोदर असून जुलै महिन्यात चिमुकल्या बाळाला ती जन्म देणार आहे.

विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटात छंदोगामात्य ऊर्फ कविकलश यांची जबरदस्त भूमिका साकारलेला अभिनेता विनीत कुमार सिंह लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

Chhawa fame actor Vineet Kumar Singh

विनीतने पत्नीसोबतचे खास फोटो इन्स्टावर शेअऱ केले आहेत. त्यात त्याने लिहिले की, 'नवीन आयुष्य आणि आशीर्वाद. बाळ लवकरच येणार आहे. चिमुकल्याला बाळाला नमस्ते. आम्ही तुझं स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत.

दुसरे म्हणजे, या आनंदाची बातमीविषयी विनीतने एका मीडियाशी संवाद देखील साधला. तो म्हणाला की, आयुष्यातील हा टप्पा आम्हा दोघांसाठी खूप खास आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. प्रत्येक गोष्ट आता नवीन वाटू लागली आहे. मला प्रत्येक क्षणाचा साक्षीदार व्हायचं आहे.

Chhawa fame actor Vineet Kumar Singh

काम अन् कुटुंबाचे कसे राखताहेत बॅलन्स..!

विनीत पुढे म्हणाला, 'मी रुचिराची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. मी माझे काम लवकरात लवकर संपवून घरी परततो. मी माझे वेळापत्रक असे आखले आहे की, मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकेन. जुलैमध्ये बाळाच्या आगमनानंतर मी पितृत्व रजा देखील घेण्याचा विचार करत आहे.

Chhawa fame actor Vineet Kumar Singh

विनीत कुमार सिंगचे लग्न कधी झाले होते?

विनीत कुमार सिंग याने 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांची मैत्रीण रुचिरा हिच्याशी लग्न केले आणि आता तीन वर्षांनंतर ते त्यांच्या पहिल्या मुलाचे पालक होणार आहेत. अभिनेत्याच्या पत्नीची प्रसूती जुलैमध्ये होईल.

विनीतने 2002 मध्ये संजय दत्तच्या 'पिता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातील त्याच्या कामाला फारशी ओळख मिळाली नाही. नंतर अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील भूमिकेमुळे त्याला खास प्रसिद्धी मिळाली.

2018 मध्ये अनुराग कश्यपच्याच 'मुक्काबाज'मध्ये विनीतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून विनीत 'छावा' या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेला आहे. विकी कौशलच्या या चित्रपटात त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+