बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा 'छावा' चा जलवा, भारतातील सर्वाधिक कमाई करणारा 10 वा चित्रपट बनला
Box Office Collection: विकी कौशल्यचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून कमाईच्या बाबतीत दररोज नव-नवीन विक्रम मोडत आहे. सलग चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत. आता 'छावा' चित्रपटाने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. भारतातील सर्वाधिक कमाई करणारा 10 वा चित्रपट छावा बनला आहे.
विक्की कौशल्यचा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दररोज नवे-नवे विक्रम करत आहे. या चित्रपटाने शनिवारी 23 व्या दिवशी 16.75 कोटीचा गल्ला जमवला आहे. तर आता 24 व्या दिवसाची ही कमाई समोर आली आहे. सैकनिकच्या रिपोर्टनुसार 24 व्या दिवशी 11.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सोबतच या चित्रपटाची एकूण कमाई ही आता 533.84 रुपये झाली आहे.

छावा चित्रपटाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. आता छावाने गदर-2 चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. गदर चित्रपटाचे लाइफटाइम एकूण कलेक्शन 525.7 कोटी रुपये आहे. या सोबतच हा छावा चित्रपट आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा 10 वा चित्रपट बनला आहे. तसेच छावा चित्रपट आता बॉलिवूडचा किंग खानचा पठाण चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे.
छावाची विक्रमी कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदान्ना यांनी महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ही 533.84 रुपये झाली आहे.












Click it and Unblock the Notifications