"शौर्य सर्वपूज्यते, राष्ट्रमेव जयते!" – 4 जूनपासून 'सम्राट पृथ्वीराज चौहान' यांची अमरगाथा

भारताच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी बालसम्राटाची गौरवशाली कहाणी लवकरच आपल्या टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन 'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' या भव्य ऐतिहासिक मालिकेच्या माध्यमातून 4 जूनपासून संध्याकाळी 7:30 वाजता या पराक्रमी राजाची गाथा सादर करणार आहे.

Prithviraj Chauhan Sony TV

बालराजाचा पराक्रम, राष्ट्रासाठी अर्पण

पृथ्वीराज चौहान यांना लहान वयातच सिंहासनावर बसवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी इतिहासातील एक अत्यंत क्रूर आक्रमक मोहम्मद घोरीचा पराभव करत भारताचे रक्षण केले. पराक्रमाच्या बळावरच नव्हे, तर धैर्य, करुणा आणि राष्ट्रप्रेमाच्या जोरावर त्यांनी आपल्या नियतीला नव्याने घडवलं.

ही फक्त युद्धाची गोष्ट नाही, ही कथा आहे अशा राजाची, ज्याने आपल्या हृदयापेक्षा देशाला आणि स्वतःहून आपल्या जनतेला अधिक महत्त्व दिलं. पृथ्वीराज चौहान केवळ शस्त्रसंपन्न योद्धा नव्हते, तर एक मुत्सद्दी सम्राट होते ज्यांच्या बुद्धिमत्तेने भारताचं भविष्य घडवलं.

अशुतोष राणांच्या आवाजात 'चंद बरदाई' - एक विश्वासू सखा

या ऐतिहासिक महागाथेचा सूत्रधार आणि पृथ्वीराज चौहान यांचे सखा व राजकवी चंद बरदाई यांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा दिसणार आहेत.

आशुतोष राणा म्हणतात,

"पृथ्वीराज चौहान हे एक असे राजा होते ज्यांचं प्रेम म्हणजे आपली प्रजा आणि आपला देश. वडिलांच्या पावलांवर चालत त्यांनी बालवयातच युद्धनीती आत्मसात केली. राष्ट्राच्या अभिमानासाठी त्यांनी कोणतीही किंमत मोजण्यास मागेपुढे पाहिलं नाही.

आजच्या तरुणांनी जर कोणाकडून प्रेरणा घ्यायची असेल, तर ती पृथ्वीराज चौहान यांच्याकडून घ्या." "त्यांचा जीवनप्रवास म्हणजे त्याग, शौर्य आणि स्वाभिमानाची अमर कहाणी आहे," असंही राणांनी नमूद केलं.

एक राष्ट्रभक्त योद्ध्याची प्रेरणादायक गाथा

'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' ही मालिका केवळ मनोरंजन नाही, तर आजच्या पिढीला आपल्या इतिहासातील महानायकांची ओळख करून देणारी प्रेरणादायी यात्रा आहे. ज्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी लढा दिला आणि आपले जीवन त्यागले - अशा वीराची गाथा आता प्रत्येक घरात पोहोचणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+