सेलिब्रीटी लीग 2025! 9 फेब्रुवारीला मुंबई हिरोज भिडणार भोजपुरी दबंगसोबत; कसे आहे वेळापत्रक..? वाचा

CCL 2025 : सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि त्याची सुरुवात 8 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे चेन्नई राइनोज आणि बंगाल टायगर यांच्यातील सामन्याने होईल. भोजपुरी दबंग संघ 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मुंबई हिरोज विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना लीगमधील चौथा सामना असेल आणि दोन्ही संघांमधील स्पर्धेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Celebrity League 2025

भोजपुरी संघाचा सराव सुरु

मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली भोजपुरी दबंग संघ विजयासाठी सज्ज झाला आहे. संघाचा उपकर्णधार निरहुआ, स्टार खेळाडू रवी किशन, पवन सिंग आणि खेसरीलाल यादव नेट सरावात व्यस्त आहेत. मनोज तिवारी म्हणाले, "आमचा संघ पूर्णपणे तयार आहे. खेळाडू यावेळी स्पर्धा जिंकण्याचा निर्धार करतात. आम्हाला प्रेक्षकांच्या पूर्ण पाठिंब्याची गरज आहे." भोजपुरी संघ ९ फेब्रुवारीला मुंबई हिरोजसोबत खेळेल. हा सामना दिल्लीत होणार आहे. बाँलिवूडचे हिरो भोजपुरी संघाचा कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कसे आहे वेळापत्रक

9 फेब्रुवारी: पहिला सामना - भोजपुरी दबंग विरुद्ध मुंबई हीरोज (दिल्ली)
14 फेब्रुवारी: दुसरा सामना - भोजपुरी दबंग विरुद्ध तेलुगू वॉरियर्स (हैदराबाद)
16 फेब्रुवारी: तिसरा सामना - भोजपुरी दबंग विरुद्ध पंजाब द लायन्स (कटक)
22 फेब्रुवारी: चौथा सामना - भोजपुरी दबंग विरुद्ध चेन्नई राइनोज (सूरत)

2 मार्चला अंतिम सामना

मुंबई हिरोजच्या संघात कोण-कोण खेळेत हे अजून समोर आलेले नाही. मात्र हे सामने रंजक होतील, असे समजते. भोजपुरी संघाच्या तयारीची बातमी मात्र समोर आली आहे. स्टार खेळाडूंच्या उपस्थितीमुळे भोजपुरी दबंगच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी मनोज तिवारीचा संघ CCL 2025 चे विजेतेपद पटकावेल, अशी आशा सर्वांना आहे. यावेळी सेलिब्रिटी क्रिकेट लीग हॉटस्टार आणि सोनी टेन 3 वर प्रसारित होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+