Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार'-2 अन् धडक 2 ‘सैय्यारा'च्या मागेच! वाचा कोणत्या चित्रपटाने किती केली कमाई?

Box office collection : चित्रपटसृष्टीत सध्या चांगल्या चित्रपटांना भाव असून बॅक्स ऑफीसवर सय्याराने अनाकलनीय कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट तीनशे कोटींवर जात आहे. अशातच अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांचा सन ऑफ सरदार - २ सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या 'धडक २' प्रदर्शित झाले आहेत. हे दोन्हीही चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटानेही हळूहळू चांगला गल्ला जमवायला सुरूवात केली आहे.

सन ऑफ सरदार २ आणि धडक या दोन्ही चित्रपटाचे सुरुवातीच्या कमाईचे आकडे समोर येऊ लागले आहेत, यावरून बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या स्पर्धेचा अंदाज दिसून येत आहे.

Box office collection

सन ऑफ सरदार २ ची कमाई किती?

ट्रेड अॅनालिस्ट सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' ने दुसऱ्या दिवशी साडे सात कोटी रुपये कमावले आहेत. या कमाईसह, चित्रपटाचा एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता १४.७५ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाबाबत बऱ्याच अपेक्षा असल्या तरी, हा सिनेमा फारसा रुचलाच असे नाही.

सन ऑफ सरदार-२ वर भारी सय्यारा

सन ऑफ सरदार २ च्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तो प्रेक्षकांना अपेक्षेइतका प्रभावित करू शकला नाही. चित्रपटाची सुरुवात खूपच संथ आहे. याचे एक कारण म्हणजे सैयारा हे आहे. कारण या चित्रपटाची जादू सिने रसिकांवर खास करुन युवा वर्गावर आहे. आणि सैय्याराने पुन्हा एकदा आठवड्याच्या शेवटी जोरदार कमाई केली आहे.

सैय्याराची कमाई किती?

सैय्यारा चित्रपटाने १६ व्या दिवशी ६.३५ कोटींची कमाई केली आहे आणि हा चित्रपट जवळपास तीनशे कोटी रुपयांची कमाई करत असल्याचे आकडे समोर आले आहे. शनिवारच्या तुलनेत चित्रपटाची कमाई वाढली आहे. या आठवड्यात दोन नवीन चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' यांचा समावेश आहे. परंतु याचा 'सैयारा'वर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.

धडक २ चित्रपटाची किती कमाई?

'धडक २' या सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३.७५ कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार 'धडक २' चा एकूण कलेक्शन दोन दिवसांत ७.२५ कोटींवर पोहोचला आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही 'धडक २' कमाईच्या बाबतीत 'सन ऑफ सरदार २' पेक्षा खूपच मागे होता.

सन ऑफ सरदारच्या पहिल्या भागाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर या चित्रपटाला हिट श्रेणीचा दर्जाही मिळाला. मात्र, यावेळी चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. निर्मात्यांना आशा आहे की आठवड्याच्या शेवटी कलेक्शन वाढेल. परंतु यामध्येही चित्रपट निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+