'बॉर्डर 2'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! अवघ्या 4 दिवसांत 'एवढी' बक्कळ कमाई; जाणून घ्या सिनेमा कसा आहे?
Border 2 Box Office Collection Day 4 : सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागून एक रेकॉर्ड मोडत आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ वीकेंडलाच नव्हे, तर 'मंडे टेस्ट'मध्येही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सोमवारी या चित्रपटाने रविवारीपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच थक्क केले आहे.

४ दिवसांत गाठला १८० कोटींचा टप्पा
बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग वेबसाईट 'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी तब्बल ५९ कोटी रुपयांची बंपर कमाई केली. ही कमाई रविवारी झालेल्या कलेक्शनपेक्षा ८ टक्क्यांनी अधिक आहे.
- पहिला दिवस: ३० कोटी रुपये
- पहिले ३ दिवस (वीकेंड): १२१ कोटी रुपये
४ दिवसांचे एकूण कलेक्शन
साधारण १८० कोटी रुपये ज्या वेगाने चित्रपट प्रगती करत आहे, ते पाहता हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊन २०२६ चा पहिला 'ब्लॉकबस्टर' ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
'बॉर्डर २' का पाहावा? (Why to Watch Border 2)
१. सनी देओलचा दमदार वावर: सनी पाजींचा आवाज आणि त्यांचे देशभक्तीने भरलेले संवाद आजही अंगावर शहारे आणतात.
२. १९७१ च्या युद्धाची गाथा: भारत-पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाची कथा अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
३. तगडी स्टारकास्ट: सनी देओलसोबतच वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचा दमदार अभिनय पाहण्यासारखा आहे.
४. नॉस्टॅल्जिया आणि इमोशन्स: जुन्या 'बॉर्डर' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देतानाच यात दिलेले भावनिक सीन प्रेक्षकांना थेट जोडून घेतात.
५. देशभक्तीचा ज्वर: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाभिमानाची भावना जागवणारा हा एक सर्वोत्तम वॉर ड्रामा आहे.
'बॉर्डर २' चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
- दिवस १ (शुक्रवार): ₹ ३० कोटी (जोरदार ओपनिंग, सनी देओलची जादू कायम.)
- दिवस २ (शनिवार): ₹ ४३ कोटी (प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कमाईत ४३% वाढ.)
- दिवस ३ (रविवार): ₹ ४८ कोटी (प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टीचा फायदा, ऐतिहासिक कमाई.)
- एकूण ३ दिवस: ₹ १२१ कोटी (चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये १०० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.)












Click it and Unblock the Notifications