प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानीचा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, पुण्यातील म्यूझिक कॉन्सर्ट पुढे ढकला
Vishal Dadlani Accident: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलानी यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. विशाल ददलानीचा मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. या अपघातामुळे त्याने पुण्यातील त्याचा म्यूझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
विशाल ददलानीने इंस्टा स्टोरीवर दिली माहिती
विशाल ददलानी यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे लोकांना या अपघाताची माहिती दिली आहे. त्याच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना त्याने सांगितले आहे की, माझा एक छोटासा अपघात झाला. मी लवकरच परत येईन, मी तुम्हाला सर्वांना अपडेट देत राहीन.

विशालसोबतच आयोजकांनीही त्यांच्या सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. या अपघातामुळे विशाल ददलानी यांनी पुण्यात होणारा त्यांचा म्यूझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. हा कार्यक्रम 2 मार्च 2025 रोजी होणार होता, पण आता पुढे ढकलण्यात आला आहे.
तिकीटाची रक्कम रिफंड मिळणार
दरम्यान कार्यक्रमाच्या आयोजकांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे लोकांना याबद्दल माहिती दिली आहे आणि तिकीट परतफेड प्रक्रियेबद्दल देखील सांगितलं आहे. आयोजकांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की- आम्हाला कळवण्यास दुःख होत आहे की, 2 मार्च 2025 रोजी होणारा विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांचा बहुप्रतिक्षित म्यूझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम विशाल ददलानी यांच्या अपघातामुळे पुढे ढकलण्यात आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो आणि तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. नवीन हा कार्यक्रम लवकरच होणार आहे आणि आम्ही तुम्हाला त्याची तारीख लवकरच कळवू. ज्या चाहत्यांनी या म्यूझिक कॉन्सर्ट कार्यक्रमाची तिकिटे खरेदी केली आहेत ते त्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळवू शकतात. तिकिट परत करण्याच्या प्रक्रियेसाठी आयोजकांनी त्यांच्या विशेष तिकीट भागीदार डिस्ट्रिक्ट द्वारे पूर्ण परतफेड करण्याची घोषणा केली आहे.












Click it and Unblock the Notifications