Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'आज मी जिवंत आहे ते...' अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करत मानले आभार

Nushrat Bharucha : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या तिच्या 'छोरी 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. नुसरतने पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये नुसरत भरुचाने पंतप्रधानांशी हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानताना दिसत आहे.

नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात खरंतर नुसरत भरुचाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्याचे आभार मानले आहेत. 2023 मध्ये युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांपैकी नुसरत त्यापैकी एक होती. इस्रायलमधून सुरक्षित परत आणल्याबद्दल तिने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. नुसरतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पंतप्रधान मोदींचे हात जोडून स्वागत करताना दिसत आहे. तसेच नुसरतने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करत आभार ही मानले आहेत.

nushrat bharucha

पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे फोटो नुसरतने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, "सीएनएन-न्यूज 18 रायझिंग इंडिया समिटमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आणि खूप आभारी आहे. मोदीजी, तुमच्या अटल नेतृत्वाबद्दल आणि अलिकडच्या संघर्षादरम्यान इस्रायलमध्ये अडकलेल्या माझ्यासह भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी तुमच्या सरकारने केलेल्या त्वरित कारवाईबद्दल वैयक्तिकरित्या आभार मानणे माझ्यासाठी एक अविश्वसनीय भाग्य आहे." असं तिने म्हटलं आहे.

नुसरत युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकली होती

दरम्यान 2023 मध्ये नुसरत एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकली होती. त्यावेळचा अनुभव तिने शेअर केला आहे. नुसरत पुढे बोलताना म्हणाला की, त्या काळात घडलेल्या प्रत्येक क्षण अकल्पनीय होता, तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. त्याठिकाणी त्यावेळी युद्ध सुरु होते, त्यावेळी मी अडकलेल्या लोकांसह तळघरात लपून बसली होती. काही तास न खाता-पिता घाबरून शांत राहिली. तो क्षण माझ्यासाठी असा होता, जो मी कधीही विसरू शकत नाही.

नुसरत पुढे बोलताना म्हणाली की नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मी इस्रायलहून घरी परतू शकले आहे. कारण त्या काळात, भारत सरकारच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने एक ऑपरेशन केले आणि सर्व सैनिकांनी इस्रायलमधून आमच्यासारख्या लोकांना परत आणण्यात यशस्वी झाले.

तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता

नुसरतने तो काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असल्याचं सांगितलं आहे. "तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. मला वाटले नव्हते की मी माझ्या कुटुंबाला किंवा मित्रांना पुन्हा भेटू शकेन. मी खूप त्रासात होते. मला वाटले की बस, आता सर्वकाही संपले."सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानून तिने आपलं भाषण संपवलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+