तुम्ही रोहितला 'जाड' म्हणलात, सोशल मिडीयावर ट्रोल झाल्यानंतर जावेद अख्तर यांच यूजरला सडेतोड उत्तर
Javed Akhtar On Rohit Sharma: प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर सध्या सोशल मिडीयावर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर विराट कोहलीचे कौतुक केले आहे. पण त्याआधीच त्यांना ट्रोल केले जात आहे.

जावेद अख्तर यांनी विराट कोहलीचे अभिनंदन केले
गीतकार जावेद अख्तर यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदनही केले आहे. त्यांनी लिहिले आहे - पुन्हा एकदा विराटने सिद्ध केले आहे की तो आजच्या भारतीय क्रिकेटच्या इमारतीचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे!!! शुभेच्छा!!
Once again Virat has proved that he is the strongest pillar of today’s Indian cricket’ s edifice ! ! ! . Hats off !!
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 5, 2025
जावेद अख्तर सोशल मिडीयावर ट्रोल
जावेद अख्तर यांच्या या पोस्टनंतर त्यांना सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. लोक यावर जोरदार कमेंट करत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले- जर विराट सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे, तर रोहित शर्मा कोण आहे? सर्वात जड स्तंभ? दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, "भारतीय कर्णधाराला जाड म्हणण्याबद्दल जावेद साहेबांना लाज वाटली पाहिजे."
जावेद अख्तर यांनी दिले सडतोड उत्तर
सोशल मिडीयावर ट्रोल केल्यानंतर जावेद अख्तरही चांगलेच संतापले आहेत. त्यांनी खोट्या आरोपांसाठी सोशल मीडिया वापरकर्त्यांवर जोरदार टीका केली. जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे की, - "गप्प बस, तू झुरळ आहेस. मला रोहित शर्मा आणि कसोटी इतिहासातील सर्व महान भारतीय क्रिकेटपटूंबद्दल खूप आदर आहे.
रोहित शर्मासारख्या महान खेळाडूच्या प्रतिष्ठेविरुद्ध मी कधी बोललो असा दावा करणारे तुम्ही किती नीच आणि खोटे आहात? कधी विचार करा की तुम्ही इतके वाईट आणि घाणेरडे का आहात?", असं जावेद अख्तर यांनी आपल्या पोस्टमध्ये यूजरला म्हटलं आहे.
Shut up you cockroach. I have great respect for Rohit sharma and all the great India cricketers of Test history . What kind of a neech And pathatic lair you are that you are claiming that I have ever said a word against dignity of a great player like Rohit . Kabhi socho tum itnay…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 5, 2025
काँग्रेस नेत्याने रोहित शर्माला 'जाड' म्हटलं होतं
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोहीत शर्मा बद्दल टिपण्णी केली होती. शमा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते- रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे.
रोहित शर्माला वजन कमी करण्याची गरज आहे. तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे. त्याच्यात असे काय आहे जे त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे बनवते? तो एक सामान्य कर्णधार आहे आणि त्याचबरोबर एक सामान्य खेळाडू आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा बहुमान मिळाला, असं काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांच्या या पोस्टमुळे चाहते चांगलेत संतापले होते, त्यामुळे त्यांना ती पोस्ट डिलीट करावी लागली.












Click it and Unblock the Notifications