Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mardaani 3 Review : राणी मुखर्जीचा पडद्यावर धमाका; मुलींच्या तस्करीची हृदयद्रावक कहाणी,वाचा विश्लेषण

Rani Mukerji Mardaani 3 Review in Marathi : बॉलिवूडची 'खऱ्या अर्थाने' राणी असलेल्या राणी मुखर्जीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, अभिनयाच्या जोरावर ती संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलू शकते. 'Mardaani 3 ' हा केवळ एक क्राईम थ्रिलर नाही, तर तो समाजातील एका भयाण वास्तवाचा आरसा आहे.

Mardaani 3 Review   Rani Mukerji

कथानक: मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गुढ

चित्रपटाची कथा एका शहरातून एकामागून एक बेपत्ता होणाऱ्या लहान मुलींपासून सुरू होते. 'शिवानी शिवाजी रॉय' (राणी मुखर्जी) या प्रकरणाचा तपास हाती घेते.

सुरुवातीला हे प्रकरण केवळ एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याचे वाटते, परंतु जसा तपास पुढे सरकतो, तसे या प्रकरणाचे धागेदोरे एका मोठ्या आणि भयानक जाळ्यापर्यंत पोहोचतात.

या मुली नक्की का गायब होत आहेत? काही मुलींची निर्घृण हत्या का केली जात आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधताना प्रेक्षकांचे हृदय पिळवटून निघते.

राणी मुखर्जी : चित्रपटाचा 'कणा'

या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर राणी मुखर्जीने अधिराज्य गाजवले आहे. राणीने हे पात्र केवळ साकारलेले नाही, तर ती शिवानी रॉय जगली आहे असे वाटते. तिने या भागात अतिशय आत्मविश्वासाने मराठी संवाद फेकले आहेत, जे पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. पटकथा काही ठिकाणी संथ होत असली, तरी राणीचा दमदार अभिनय चित्रपटाला सावरून धरतो आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

अभिनय आणि दिग्दर्शन

मल्लिका प्रसाद (अम्मा) : या चित्रपटात मल्लिकाने 'अम्मा' नावाच्या खलनायिकेची भूमिका केली आहे. तिच्या डोळ्यांतील क्रूरता आणि तिची वागण्याची पद्धत प्रेक्षकांमध्ये भीती निर्माण करण्यात यशस्वी ठरते. राणीसमोर एक तगडा खलनायक उभा करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.

जानकी बोडीवाला: जानकीनेही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला असून तिचे काम प्रभावी झाले आहे.

दिग्दर्शन आणि लेखन : दिग्दर्शक अभिराज मीनावाला यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून उत्तम हाताळणी केली आहे. आयुष गुप्ता, दीपक किंगराणी आणि बलजीत सिंग मारवाह यांचे लेखन अधिक घट्ट होऊ शकले असते, परंतु राणीच्या परफॉर्मन्समुळे या त्रुटी लपल्या गेल्या आहेत.

चित्रपट का पाहावा?

सत्य घटनांचे प्रतिबिंब: चित्रपटाचा ट्रेलर जरी 'दिल्ली क्राईम ३' ची आठवण करून देत असला, तरी चित्रपटाची मांडणी पूर्णपणे वेगळी आणि अधिक हृदयस्पर्शी आहे. हा चित्रपट मुलींच्या तस्करीच्या पलीकडे जाऊन मानवी क्रूरतेवर भाष्य करतो. चित्रपट पाहताना पुढील क्षणी काय घडणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते.

  • चित्रपट : Mardaani 3
  • कलाकार : राणी मुखर्जी, मल्लिका प्रसाद, जानकी बोडीवाला
  • दिग्दर्शक : अभिराज मीनावाला
  • रेटिंग : 5 पैकी साडे तीन..!
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+