अभिनेता रोहित बासफोर यांचे निधन ; कुटुंबाने केला खुनाचा आरोप
Rohit Basfore Death: बॉलिवूड विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहित बासफोर यांचे निधन झाले आहे. रोहितने ओटीटी वेब सिरीज आणि प्रादेशिक टेलिव्हिजन शोमध्येही काम केले होते. "फॅमिली मॅन 3" या आगामी वेब सिरीजमध्ये काम करणारा अभिनेता रोहित बासफोरचा मृतदेह 27 एप्रिल 2025 रोजी आसाममधील गारभांगा धबधब्याजवळ सापडला आहे.
रोहितच्या कुटुंबाने हा मृत्यू अपघात नसून खून असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबाच्या मते, रोहितचा खून त्याच्या मित्रांनीच नियोजित पद्धतीने केला असल्याचा आरोप कुटूंबाने केला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून चार संशयित आरोपी फरार आहेत.

रिपोर्टनुसार, अभिनेता रोहित बासफोर काही महिन्यांपूर्वी मुंबईहून गुवाहाटीला आला होता. रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला बाहेर पडला. त्याने त्याच्या कुटुंबाला सांगितले होते की तो एका छोट्या सहलीला जात आहे. तसेच दिवस उलटत असताना रोहितशी त्यांच्या कुटूबांचा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबाची चिंता वाढली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एका मित्राने कुटुंबाला अपघाताची माहिती दिली. रोहित तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले.
कुटुंबाचा खुनाचा आरोप आणि पार्किंग वाद
रोहितच्या कुटुंबाने या मृत्यूला अपघात मानण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते, हा एक नियोजित खून आहे, ज्यामागे त्याचे चार मित्र जबाबदार आहेत. कुटुंबाने रणजीत बासफोर, अशोक बासफोर, धरम बासफोर आणि अमरदीप या चार जणांवर खुनाचा आरोप केला आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, एका आठवड्यापूर्वी रोहित आणि या तीन मित्रांमध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. या वादादरम्यान रणजीत, अशोक आणि धरम यांनी रोहितला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर रोहित तणावात होता, परंतु त्याने याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नव्हते, असे कुटुंबाने सांगितले.
या घटनेत अमरदीप हा एका जिमचा मालक आहे, ज्याने रोहितला पिकनिकसाठी बोलावले होते. कुटुंबाने अमरदीपवरही संशय व्यक्त केला आहे आणि त्याचा या खुनात सहभाग असल्याचा दावा केला आहे. कुटुंबाने सांगितले की, रोहितला नियोजित पद्धतीने धबधब्याजवळ नेले गेले आणि तिथे त्याचा खून करण्यात आला. या आरोपांमुळे पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेतले असून, तपासाची दिशा बदलली आहे.












Click it and Unblock the Notifications