दीपिका-रणवीर 119 कोटींच्या नव्या घरात शिफ्ट होणार, शाहरुख खानचे बनणार शेजारी
Deepika Padukone-Ranveer Singh New Home : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. दीपिकचा पती रणवीर सिंग याने स्वतः सांगितले होते की दीपिकाची डिलिव्हरी सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच हे जोडपं आपल्या नवीन घरात प्रवेश करणार असल्याची बातमी आहे.
दीपिका पदुकोण-रणवीर सिंगचे नवीन घर
मीडिया रिपोर्ट्सवर नुसार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या १०० कोटींहून अधिक किमतीच्या नवीन घराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या इमारतीचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची बरीच चर्चा होत आहे.
दीपिका बनणार सुपरस्टार शाहरुख खानची शेजारी
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ज्या इमारतीत शिफ्ट होणार आहेत, ती इमारत सुपरस्टार शाहरुख खानच्या घर 'मन्नत'च्या अगदी जवळ आहे आणि ती मुंबईतील सर्वात पॉश आणि महागड्या भागात आहे. रणवीर आणि दीपिकाने दोन वर्षांपूर्वी या इमारतीत अपार्टमेंट बुक केले होते. तेव्हापासून त्यांच्या नवीन अपार्टमेंटचे काम सुरू आहे.

मुलाच्या जन्मानंतर दीपिका-रणवीर नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे दीपिका पदुकोण पती रणवीर सिंग आणि मुलासोबत या नवीन घरात शिफ्ट होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे हे नवीन घर मुंबईतील वांद्रे भागात आहे. शाहरुख खानच्या घर 'मन्नत'च्या अगदी मागे त्याचा अपार्टमेंट आहे. दीपिका-रणवीरच्या नवीन अपार्टमेंटमधून समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. या आलिशान उंच इमारतीचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.
या अपार्टमेंटमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने 4 मजले खरेदी केले आहेत. त्यांच्या नवीन घराची किंमत बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यापेक्षा जास्त आहे. दीपिका आणि रणवीरने इमारतीच्या 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर फ्लॅट्स खरेदी केले आहेत. अपार्टमेंटचे एकूण चटईक्षेत्र 11,266 चौरस फूट आहे. 1300 स्क्वेअर फूट एक्सक्लुझिव्ह टेरेस देखील आहे. याशिवाय इमारतीच्या आत 19 पार्किंग्स जागा आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका-रणवीरने नवीन अपार्टमेंटच्या नोंदणीसाठी 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. यामुळे याचा दर टेरेसचे क्षेत्र वगळून प्रति चौरस फूट रु. 1.05 लाख होतो. या मालमत्तेत अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत. या नवीन अपार्टमेंटमध्ये पर्सनल जिम, स्विमिंग पूल, मनोरंजनाची जागा आहे, जी त्यांचे व्यावसायिक आयुष्य लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications