Chhaava BO Day 3: छावा ने तीन दिवसांत केली मोठी कमाई, पहिल्याच आठवड्यात मोडला हा विक्रम
Chhaava Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'छावा' चित्रपट बॉक्सऑफिसवर बंपर कमाई करत आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात विकी व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना हे देखील मुख्य भूमिकेत होते. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम करत आहे.
'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट दररोज कमाईचे नवे विक्रम मोडत आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची चांगली ओपनिंग केली. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने 37 कोटींचा आकडा ओलांडला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 48 कोटी रुपये कमावून धमाकेदार कलेक्शन केलं आहे.

जर आपण एकूण कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत 116.5 कोटींची कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट जगभरात विक्रमी कमाई करत आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने जगभरात 150 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.
जर 'छावा' चित्रपटाने कमाईचा ट्रेंड कायम ठेवला तर तो 2025 मध्ये विकी कौशलचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल. या चित्रपटाला आठवड्याच्या शेवटी खूप फायदा झाला. सोशल मीडियावरही लोक याला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.
'छावा' चित्रपटाचे बजेट सुमारे 130 कोटी रुपये असल्याचं सांगितले जातं आहे. जे चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच वसूल केलं आहे. 'छावा'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, विक्की कौशल, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग आणि संतोष जुवेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. चाहत्यांना चित्रपटाची कथा खूप आवडली असून येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications