उर्मिला मांतोडकरचे दुसऱ्या धर्मात लग्न, 8 वर्षानंतरही आई होऊ शकली नाही, घटस्फोटाचे हे आहे का कारण ?
Urmila Matondkar Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये मोहसिन अख्तर मीरशी गुपचूप लग्न केले. पण 8 वर्षांचे लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. होय अभिनेत्री लवकरच तिच्या पतीपासून घटस्फोट घेणार आहे.
उर्मिला आणि मोहसिनच्या लग्नाच्या घटस्फोटच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार उर्मिलाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असून हे प्रकरण परस्पर संमतीने घडत नाही. त्यांच्या घटस्फोटाचे कारण अद्याप कोणालाच माहीत नाही. आणि ही बातमी उर्मिलाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का देणारी आहे.

दरम्यान लग्नाच्या 8 वर्षात उर्मिला आणि मोहसीन यांनी अद्याप पालक होण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना याबद्दल अनेकदा विचारले आहे. परंतु उर्मिला कधीही याबद्दल जास्त बोलली नाही. पण एका जुन्या मुलाखतीत उर्मिलाने यामागचे कारण सांगितले होते.
उर्मिलाने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आई होण्याबाबतचे तिचे विचार शेअर केले होते. ती म्हणाली होती, "मी आई होण्याचा विचार करत आहे किंवा नाही. तसे झाले तर ते होईल. पण मला त्याची अपेक्षा नाही. आणि असे नाही की, मी याचा विचार करत नाही. माझ्या मते प्रत्येक स्त्रीसाठी आई बनणे फार महत्वाचे नाही.. हे एका चांगल्या कारणासाठी असले पाहिजे आणि मला मुले खूप आवडतात. पण अशी अनेक मुलं आहेत, ज्यांना आपल्या काळजीची आणि प्रेमाची गरज असते.
उर्मिलाची मोहसिन अख्तर मीरसोबत पहिली भेट मनीष मल्होत्राच्या पार्टीत झाली होती. यादरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर 2016 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केले. आता 8 वर्षांनंतर दोघेही घटस्फोट घेणार आहेत. मात्र उर्मिलाने याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.












Click it and Unblock the Notifications