Tripti Dimri : तृप्ती डिमरीच्या पोस्टरला महिलांनी काळं फासलं, नेमकं काय आहे प्रकरण ?

Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती दिमरी सध्या तिच्या आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटामूळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जयपूरमधील काही महिलांनी तृप्तीच्या पोस्टरला काळे फासलं आहे. एका संघटनेच्या महिलांनी तृप्ती डिमरी यांच्या पोस्टरला मार्करने काळं फासलं आहे.

'फिक्की फ्लो जयपूर चॅप्टर'च्या वतीने जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला तृप्ती हजेरी लावणार होती. पण काही कारणास्तव तिला या कार्यक्रमाला उपस्थितीत राहाता आले नाही. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे. तृप्ती डिमरीला या कार्यक्रमासाठी मोठी फिस देण्यात आली होती. मात्र फिस घेऊन सुध्दया अभिनेत्रीने कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने महिलांनी संताप व्यक्त करत तिच्या पोस्टला काळं फासलं आहे. आणि तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.

Tripti Dimri

कार्यक्रमाचे पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप

दरम्यान तृप्ती डिमरीने जयपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला सुरुवातीला होकार दिला होता. त्यासाठी तिने साडेपाच लाख रुपये मानधन घेतले. कार्यक्रमाशी संबंधित एका महिलेने सांगितले की, जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तिला सांगण्यात आले होते की, तृप्ती पाच मिनिटांत पोहोचत आहे. परंतु ती कार्यक्रमात पोहोचली नाही. तृप्ती यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुश्री पोद्दार यांनी तृप्ती डिमरी आणि तिच्या टीमने कार्यक्रमाचे पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. रघुश्रीने सांगितले की तृप्तीच्या टीमने तिच्या जागी राजकुमार रावला आणण्याबाबत बोलण झालं होतं, त्यामुळे महिलांना आपली फसवणूक झाल्याचे वाटले. तृप्ती डिमरीची ही कृती अजिबात योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

तृप्ती डिमरी यांच्या टीमकडून महिलांनी तृप्तीविरोधात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी होती, असं म्हटलं आहे. रघुश्री पोद्दार यांनी घोषणा केली की 'FICCI फ्लो जयपूर चॅप्टर आता तृप्ती डिमरीच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार घालणार आहे. या संपूर्ण वादानंतर तृप्ती डिमरीच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+