स्वरा भास्करचे ट्विटर अकाउंट कायमचे बंद, सोशल मीडियावर अभिनेत्री संतापली, स्वतः सांगितले कारण
Swara Bhasker: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यावर आपले मत उघडपणे व्यक्त करते. पण आता स्वराचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त करत याचे कारण सांगितले आहे.
एक्सकडून मिळालेल्या नोटीसचा स्क्रीनशॉट शेअर करताना स्वराने लिहिले, "हे सगळं हासी मजाक आहे!!!! प्रिय एक्स, दोन ट्विटमधील दोन प्रतिमा 'कॉपीराइट उल्लंघन' म्हणून चिन्हांकित केल्या आहेत. ज्यामुळे माझे खाते ब्लॉक करण्यात आले आहे." लॉक/डिसेबल केले आहे आणि कायमचे निलंबन मंजूर केले आहे."

कोणतेही कॉपीराइटचं उल्लंघन केलं नाही
स्वराने तिच्या ट्विटमधील कोणत्या पोस्टमुळे उल्लंघन मानलं गेलं आहे हे देखील सांगितले. अभिनेत्रीने लिहिले, "एका पोस्टमध्ये नारंगी पार्श्वभूमीत हिंदी देवनागरी मजकूर होता 'गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कतिल जिंदा हैं', जो भारताच्या पुरोगामी चळवळीचा एक लोकप्रिय नारा आहे. यामध्ये कोणतेही कॉपीराइट उल्लंघन नाही, हे एक आहे, आधुनिक शहरी लोक वाक्प्रचार आहे", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
स्वराने प्रश्न उपस्थित केला की तिच्या मुलीचा फोटो कॉपीराइट उल्लंघन कसा मानला जाऊ शकतो. अभिनेत्रीने लिहिले की, "दुसरा फोटो माझ्या स्वतःच्या मुलीचा आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा लपलेला आहे आणि ती भारतीय ध्वज फडकवत आहे. त्यावर 'हॅपी रिपब्लिक डे इंडिया' असे लिहिले आहे. हे कॉपीराइट उल्लंघन कसे असू शकते? माझ्या मुलीचे फोटोवर कॉपीराइट कोणाकडे असू शकते?" स्वराचं म्हण आहे की, हे कोणत्याही कायदेशीर व्याख्येला पूर्ण करत नाही.
माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न
जर हे ट्विट्स रिपोर्ट केले गेले असतील तर ते मला त्रास देण्याच्या उद्देशाने आहेत, असेही स्वराने म्हटलं आहे. "जर हे ट्विट इतक्या वेळा रिपोर्ट केले गेले असतील तर ते मला त्रास देण्यासाठी केले जात आहे. माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृपया तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करा आणि तो निर्णय मागे घ्या. धन्यवाद, स्वरा भास्कर."
स्वरा भास्करच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 2022 मध्ये आलेल्या 'मीमांसा' चित्रपटात दिसली होती. आता लवकरच ती 'मिसेस फलानी' मध्ये दिसणार आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने 2023 मध्ये राजकारणी फहाद अहमदशी लग्न केले आहे. त्याच वर्षी त्यांची मुलगी राबियाचा जन्म झाला आहे. स्वरा अनेकदा तिच्या राजकीय विचारांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते.ज्यामुळे नेहमी चर्चेत असते.












Click it and Unblock the Notifications