अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक, 2.6 किलो कोकेन जप्त, 30 जणांची नावे उघड
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंगबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. हैदराबादच्या कोकेन रॅकेटमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. या यादीत 30 लोकांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. अमन प्रीत सिंगला आता पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबाद पोलिसांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले की,अमन प्रीत सिंग याला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबादच्या राजेंद्र नगर एसओटी पोलिस आणि नार्कोटिक्स ब्युरोच्या संयुक्त कारवाईत अमनला इतरांसह अटक करण्यात आली आहे.अमन याने अंमली पदार्थाचे सेवन केले होते. वैद्यकीय चाचणीत ही बाब समोर आली आहे. त्याशिवाय, आणखी 12 जणांची ड्रग्ज टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Telangana: An international drug syndicate busted, 5 drug dealers - including 2 foreign nationals - nabbed. 199 grams of cocaine worth Rs 35 Lakhs seized from their possession.
— ANI (@ANI) July 15, 2024
"Actress Rakul Preet Singh's brother Aman Preet Singh arrested among drug consumers in the drug… pic.twitter.com/XHFaHoTPLO
तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी विभागाने 2.6 किलो कोकेन जप्त केले आहे. जे हैदराबादला विकण्यासाठी आणले होते. पथकाने या रॅकेटचा पर्दाफाश करत 30 संभाव्यांना अटक केली. ही सर्व 30 नावे पुढील तपासासाठी हैदराबाद आयुक्तांकडे सोपवण्यात आली आहेत.अमन हा स्ट्रगलिंग करणारा अभिनेता आहे. त्याने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. त्याला प्रवासाची खूप आवड आहे. रकुल आणि तिचे कुटुंबीय अमनच्या वादावर आतापर्यंत कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश :
तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये एका महिलेच्या नेतृत्वाखालील टोळीने 6 महिन्यांच्या कालावधीत 2.6 किलो कोकेन विक्री आणि सेवनासाठी हैदराबादला आणले होते. यानंतर, वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप संदिल्या आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली नार्कोटिक्स ब्युरोनं हैदराबादमधील 30 लोकांची माहिती काढली. हे लोक ड्रग्ज खरेदी करणार आहे. या 30 जणांची नावं सायबराबाद आयुक्तालयाकडे सोपवण्यात आली असून यामध्ये अमन प्रीत सिंगच्या नावाचाही समावेश आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications